येमली येथे प्रबोधिनी बहुउद्देशिय शैक्षणिक महिला मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित विवेकानंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात नवीन इमारतीच्या लाेकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष शशिकला बागेसर, संभाजी बागेसर, संचालक मिलिंद बागेसर, येमलीच्या सरपंच ललीता मडावी, उपसरपंच पल्लवी खोब्रागडे, माजी सरपंच रामा तुमरेटी, बुर्गीचे मुख्याधापक जयघोष मैंद, उडेराचे शिक्षक सम्राट बोरकर, प्रा. विश्वनाथ दरेकर, मुख्याधापक पी. ई. झाडे, डोलेश हिचामी उपस्थित होते. संचालन शिक्षक रामू उईके तर आभार मुख्याध्यापक प्रबोदास झाडे यांनी केले.
बाॅक्स
लाेकमतने वेधले हाेते लक्ष
विशेष म्हणजे, शाळेला इमारत नसल्याचे वृत्त लाेकमतने दाेन वर्षांपूर्वी प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत संस्थेने अल्प वेळेत इमारतीचे बांधकाम केले. शाळा इमारतीत ग्रंथालय, वायफाय, बायोमॅट्रिक हजेरी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, शाैचालय, पिण्याकरिता आरोचे पाणी, शैक्षणिक साहित्य आदींसह अन्य सुविधा आहेत.