दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेसह पदवी, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच लागलेल्या बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी गडचिरोलीत येणे अवघड झाले आहे.गतवर्षी व यावर्षीचे मिळून दोन्ही समिती कार्यालयाकडे जवळपास ४५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. ओबीसी, एससी, एनटी, एसबीसी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आहे. गतवर्षी सन २०१९-२० या वर्षात विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे एकूण दोन हजार प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यापैकी समितीने पडताळणी करून व दस्तावेजाची तपासणी करून १ हजार ८०० प्रस्ताव निकाली काढले. आता त्रुटींमुळे २०० प्रस्ताव प्रलंबित आहेत.गडचिरोली येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडे गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील प्रस्ताव येतात. जानेवारी २०१९ ते जुलै २०२० या दीड वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे एकूण १ हजार ४३२ प्रस्ताव आले. त्यापैकी १ हजार १७६ प्रस्ताव निकाली काढण्यात आले तर २५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.यावर्षीच्या नवीन प्रस्तावांची भर आता पडणे सुरू झाले आहे. आधी विद्यार्थी ऑनलाईन प्रस्ताव सादर करतात. त्यानंतर कागदपत्रे घेऊन स्वत: या कार्यालयात जावे लागते. पण बसफेऱ्याच बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यासाठी येणे अशक्य होत आहे.कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोजक्याच मार्गावर एसटी बसफेºया सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही समिती कार्यालयाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभाग व उत्तर भागातील विद्यार्थ्यांसाठी, तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उपकेंद्र निर्माण करून प्रस्ताव निकाली काढणे ग्रजेचे आहे.जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे नियोजन होते. मात्र तशा स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या नाही. जिल्हास्तरावरील समितीच्या कार्यालयात हार्डकॉपीसह प्रस्ताव स्वीकारणे सुरू झाले आहे. जिल्हाभरातून दरवर्षी २००० ते २२०० विद्यार्थ्यांचे प्रस्ताव येतात. जुलैपासून प्रस्ताव येण्यास सुरूवात होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रस्ताव येतात. बार्टी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी अहेरी उपविभागात शिबिर घेता येईल.- राजेश पांडे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्रपडताळणी समिती कार्यालय, गडचिरोली
जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST
बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी गडचिरोलीत येणे अवघड झाले आहे.
जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
ठळक मुद्दे४५६ प्रस्ताव प्रलंबित : लॉकडाऊनमुळे कागदपत्रांसह स्वत: कार्यालयात येणे होत आहे कठीण