शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

विद्यार्थ्यांनी उच्चपदे मिळवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:45 AM

स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून ,,,,,,,,,,

ठळक मुद्दे्रपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : एकलव्य विद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून अहेरीत इंग्रजी माध्यमाचे निवासी एकलव्य मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८० कोटी रुपये खर्च करून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधले जात आहेत या सर्व शैक्षणिक सोयीसुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.अहेरी येथे आदिवासी विकास विभागाकडून इसत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या आदिवासी विदयार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे याकरिता एकलव्य निवासी विद्यालय बांधण्यात आले. या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, न.पं. उपाध्यक्ष कमल पडगेलवार, नगरसेविका स्मिता येमुलवार सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन अंबोसे, अहेरीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बंसल उपस्थित होते.अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शेती सिंचन आदी कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसात अहेरी जिल्ह्याची निर्मिती होईल. वेगळा जिल्हा झाला तर अधिक गतीने विकास होईल, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सांगितले. यावेळी दीपक खांडेकर यांनीही मार्गदर्शन केले. मनीषा वर्मा यांनी राज्यात २० एकलव्य शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. या प्रत्येक शाळांच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते बारावीपर्यं ४७० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे,असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इंदूराणी जाखड, संचालन शिक्षक भाऊराव पोटे तर आभार सतीश पडघन यांनीे मानले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.