शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

एसटीचे उत्पन्न व भारमानही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:20 IST

एसटीचे उत्पन्न व प्रगती याबाबतचा आढावा घेण्यात आला. या आढावाव्यामध्ये २०१७-१८ या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात एसटीच्या उत्पन्न व भारमानात लक्षनिय घट झाल्याचे दिसून आले आहे. पुढील आर्थिक वर्षात मार्ग तपासणीची व्यापक मोहीम राबवून उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला जाणार आहे.

ठळक मुद्दे२०१८-१९ चा आढावा : चालक-वाहक व तपासणी पथक जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटीचे उत्पन्न व प्रगती याबाबतचा आढावा घेण्यात आला. या आढावाव्यामध्ये २०१७-१८ या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात एसटीच्या उत्पन्न व भारमानात लक्षनिय घट झाल्याचे दिसून आले आहे. पुढील आर्थिक वर्षात मार्ग तपासणीची व्यापक मोहीम राबवून उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला जाणार आहे.एसटीला खासगी वाहनांसोबत स्पर्धा करावी लागत आहे. खासगी वाहतूक सेवेसोबत स्पर्धा करताना एसटीने स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत. मात्र तोट्याच्या चिखलात सापडलेले एसटीचे चाक बाहेर निघण्यास कठीण जात आहे. राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्न व भारमानाचा आढावा घेतला असता, यामध्ये चालक व वाहक हे प्रवासी घेण्याबाबत उदासीन आहेत. लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये घट झाल्याने एसटीचे उत्पन्न घटले आहे. तसेच उत्पन्न घटण्यास मार्ग तपासणी पथक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.मार्ग तपासणीची यंत्रणा सक्षम झाल्यास एसटीचे उत्पन्न वाढू शकते, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाला असल्याने व्यवस्थापनाने मार्ग तपासणीसाठी पथकांसाठी १०३ वाहने खरेदी केली आहेत. त्यातील एक वाहन गडचिरोली विभागातील पथकाला उपलब्ध झाले आहे. सदर वाहन केवळ मार्ग तपासणीसाठीच वापरण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.मार्ग तपासणी पथकाला सक्त निर्देशएसटीचे भारमान व उत्पन्न कमी होण्यास चालक व वाहकांसह मार्ग तपासणी पथकालाही जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे मार्ग तपासणी मोहीम कडक करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त मार्ग तपासणी पथके तयार करावी, महिन्यातून एकदा जॅकपॉट मार्ग तपासणी कार्यक्रम राबवावा, सर्व आगारांच्या रात्रवस्तीच्या बसेसची नियमित तपासणी करावी, सर्व वाहकांची तपासणी दरमहा व अपहार प्रवृत्त वाहकांची तपासणी महिन्यातून दोनवेळा करावी, रात्रवस्तीच्या बसेसची तपासणी महिन्यातून एकदा करावी, मध्यम, लांब पल्ला, रातराणी सेवा व आंतरराज्यीय सेवांची सातत्यपूर्ण तपासणी करावी, आपल्या विभागातून जाणाऱ्या व येणाºया इतर विभागांच्या बसेसची तपासणी प्रत्येक महिन्यातून दोनवेळा करावी, आगारभेटीसाठी जाणाºया सर्व अधिकाऱ्यांनी येता-जाता मार्ग तपासणी करावे, तडजोड प्रकरणी व कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत कामगिरीवर रूजू करून घेण्यात आलेल्या वाहकांची तपासणी वारंवार करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :state transportएसटी