शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने ‘त्यांच्या’ माहेराची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दिवाळीच्या सणादरम्यान भाऊबीजेसाठी दरवर्षी माहेरापर्यंत साेडून देणाऱ्या एसटीची चाके कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे माहेराला कसे जावे, असा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. दुसऱ्या गावावरून दिवाळीसाठी गावाकडे परत येणाऱ्यांनाही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. आताही संप आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे हालच हाेणार आहेत. अशा स्थितीत संप कधी मिटणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

खासगी वाहने हाऊसफुल्ल-    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकधारकांनी घेणे सुरू केले आहे. बसस्थानकासमाेरच वाहने उभी करून प्रवाशांची उचल केली जात आहे. मागील आठ दिवसांपासून खासगी प्रवासी वाहने प्रवाशांनी फुल भरून जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे खासगी वाहतूकदारांची चांदी झाली आहे. 

कमी खर्चात अधिक उत्पन्नाची संधी गमावली

काेराेनातून सावरत असलेल्या एसटीला दिवाळीच्या कालावधीतून उत्पन्न मिळवून परिस्थिती सुधारण्याची संधी हाेती. मात्र ही संधी कामबंद आंदाेलनाने गमावल्या गेली आहे. दिवाळीपूर्वीचे उत्पन्न तर आधीच बुडाले आहेत. आंदाेलनाचा तिढा न सुटल्यास दिवाळीनंतरच्याही उत्पन्नावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताेडगा निघून आंदाेलन संपावे, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे. 

एसटीने नुकतीच तिकीट वाढ केली आहे. तसेच डिझेलचे दर प्रतिलीटर १० रुपयांनी कमी झाले. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र ही  संधी एसटीने गमावली आहे. 

माझे माहेर अमरावती जिल्ह्यातील आहे. आजपर्यंत आम्ही गडचिराेलीवरून जाणाऱ्या अमरावती बसने माहेरी जात हाेताे. मात्र यावर्षी बसेस बंद आहेत. खासगी वाहनांमध्ये प्रचंड गर्दी उसळणार आहे. त्यातच काेराेनाची भिती आहे. त्यामुळे यावर्षी भावाकडे जाणार नाही.- उज्वला चाैधरी

दिवाळीच्या सणादरम्यान शक्यताे संपूर्ण कुटुंबच दुसऱ्या गावाला जाण्यासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे दुचाकी वाहनाने प्रवास करणे शक्य हाेत नाही. चारचाकी वाहनच आवश्यक राहते. मात्र बहुतांश कुटुंबांकडे चारचाकी वाहने नाहीत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही. अशा कुटुंबाचे कुटुंबांचे हाल हाेणार आहेत. बस बंद असल्याने अनेक बहिणींनी यावर्षी भावाच्या गावाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप