शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा होईल कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:29 IST

विभाग प्रमुखांची बैठक : कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदान करावे

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जाऊ नये असे निर्देशही दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन फलक, कोनशिला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सार्वजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या. निवडणुकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. 

तत्काळ नोंदणी करण्याचे आदेश जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोलीत स्थलांतरित करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी १०० टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCode of conductआचारसंहिताElectionनिवडणूक 2024