शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:12 IST

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी येथे वादळवारा व मेघगर्जनेसह पावसाला अचानक सुरूवात झाली. वादळामुळे चंद्रपूर मार्गावरील मोठमोठी तीन झाडे कोसळली. आठवडी बाजारासाठी आलेल्या दुकानदार व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.

ठळक मुद्देतीन झाडे कोसळली : बाजारातील दुकानदार व नागरिकांची पळापळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी येथे वादळवारा व मेघगर्जनेसह पावसाला अचानक सुरूवात झाली. वादळामुळे चंद्रपूर मार्गावरील मोठमोठी तीन झाडे कोसळली. आठवडी बाजारासाठी आलेल्या दुकानदार व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.दिवसभर कडक ऊन असल्याने सायंकाळी पाऊस येईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. विशेष म्हणजे, सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे चंद्रपूर मार्गावरील तीन झाडे कोसळली. झाडाखाली असलेली रवी चेलीयालवार यांची कार क्षतिग्रस्त झाली. त्यांच्या कारचे काच फुटले तसेच कारचा समोरचा भागही दबला. वीज खांबावर झाड पडल्याने ५ वाजतापासूनच वीज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वादळ शांत होताच वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला सुरूवात केली. आंबेडकर चौकातील बारापात्रे यांच्या घरासमोरील फार जुने झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.शुक्रवारी आष्टी येथे आठवडी बाजार भरते. गावखेड्यातून शेकडो नागरिक भाजीपाला व इतर साहित्य घेण्यासाठी आठवडी बाजारात आले होते. त्यामुळे चंद्रपूर मार्गावर वाहन व नागरिकांची वर्दळ होती. दुकानासाठी बांधलेल्या ताडपत्री उडून गेल्या. अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांच्या घरावरील कवेलू व टिनाची पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.

टॅग्स :weatherहवामान