शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

विदर्भ राज्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. उलट विदर्भाच्या निधीचा अनुशेष वाढतच चालला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन होत असताना सदर वीज पश्चिम महाराष्ट्रात पाठविली जाते. विदर्भवासीयांना मात्र भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. विदर्भाच्या वाट्याला केवळ प्रदूषण येत आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत ५२ जण स्थानबद्ध : गडचिरोली, कुरखेडा, पुराडा, कढोली, सिरोंचा, आष्टी, चामोर्शी येथे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, यासाठी गडचिरोलीसह तालुकास्तरावर सोमवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीत ५२ आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. उलट विदर्भाच्या निधीचा अनुशेष वाढतच चालला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन होत असताना सदर वीज पश्चिम महाराष्ट्रात पाठविली जाते. विदर्भवासीयांना मात्र भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. विदर्भाच्या वाट्याला केवळ प्रदूषण येत आहे. विदर्भात वीज निर्मिती होत असल्याने येथील विजेचे दर कमी करावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहेत.या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सोमवारी विदर्भात तालुका, जिल्हा व प्रमुख ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळाला. गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौक या मुख्य चौकात जवळपास १५ मिनीटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चारही मार्गांवर वाहनांची मोठी रांग लागली होती. जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. यादरम्यान आंदोलनकर्त्या ५२ जणांना स्थानबद्ध करण्यात आले. स्थानबध्द केलेल्यांमध्ये सुरेश पोरेड्डीवार, अरूण मुनघाटे, रमेश भुरसे, रमेश उप्पलवार, रामचंद्र वाढई, दत्तात्रय बर्लावार, सुधाकर डोईजड, श्रीकांत मुनघाटे, पांडुरंग घोटेकर, देवाजी सोनटक्के, अमिता मडावी, नक्टू पेठकर, जनार्धन साखरे, मुक्तेश्वर काटवे, जितेंद्र मुनघाटे, एजाज शेख, प्रतिभा चौधरी, जयंत येलमुले आदींचा समावेश आहे.कुरखेडा : कुरखेडा येथे देसाईगंज मार्गावर नवीन बसस्थानकासमोर, कुरखेडा-वैरागड मार्गावर कढोली येथे, पुराडा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुराडा येथे आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह मडकाम, उपाध्यक्ष घिसू खुणे, नामदेव सोनकुसरे, ग्यानचंद्र सहारे, भागचंद्र टहलानी, पेशीलाल सोनागार, रामचंद्र रोकडे, मुक्ताजी दुर्गे, हेमलता भैसारे, कढोलीचे सरपंच चंद्रकांत चौके, किरण आकरे, योगेश जनबंधू, विश्वनाथ मेश्राम, राजीराम पाथरीकर, तुलाराम कवडो, किसनलाल सहारा, हिवराज कोहपरे, चरणदास कोकोडे आदी हजर होते.सिरोंचा : सिरोंचा येथे विदर्भवाद्यांनी आंदोलन केले. यावेळी रामभाऊ कोमेरा, किरण संगेम, दीपक दुर्गे, रूपेश संगेम, मुरली जिलेला, श्रीनाथ पडीशलावार, सागर मुलकला, शकुर राणा, राजू कोंड्रा, व्यंकटेश येलल्ला, गट्टू रमेश हरीश येनागरपू, सुशांत ओलाला, विजय बोगोनी आदी उपस्थित होते.आष्टी : आष्टी येथे आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गडचिरोली, चंद्रपूर, अहेरी या तिन्ही मार्गावरील वाहतूक एक तास अडविण्यात आली. आंदोलनात विदर्भ राज्य समितीचे अध्यक्ष संजय पंदीलवार, सचिव विजय बहिरेवार, सहसचिव सत्यवान भडके, इल्लूरचे उपसरपंच रामचंद्र बामणकर, तंमुस अध्यक्ष गणेश निष्ठुरवार, माजी जि.प. सदस्य दिवाकर कुंदोजवार, शंकर मारशेटीवार, भास्कर वाघाडे, आनंद कांबळे, सुरेश बोरकुटे, रावन खोब्रागडे, रवींद्र डोर्लीकर, आनंदराव येम्बडवार, भिकाजी बोरकुटे, गणपती हुलके, ज्ञानेश्वर येलमुले, अक्षय बामणकर, महेंद्र आत्राम, उद्धव मोंडे, देवकुमार कनकुंतलावार, पंकज पस्पुलवार, साईनाथ गुरनुले, विजय खर्डीवार आदी सहभागी झाले होते. आंदोलनाने काही काळ वाहतूक ठप्प पडली.चामोर्शी : विदर्भवाद्यांनी चामोर्शी येथे सकाळी १०.३० वाजता चक्काजाम आंदोलन केले. जवळपास आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, तालुकाध्यक्ष पी. जे. सातार, कालिदास बुरांडे, माणिकराव तुरे, श्रीकृष्णा नैताम, अशोक धोडरे, रमाकांत ओल्लालवार, विलास पिपरे, पुंजाराम वासेकर, काशिनाथ पिपरे, प्रथम कोत्तावार, मुकेश वासेकर, काशिनाथ लटारे, राजू धोडरे, लोमेश व्याहाडकर, भाऊराव धोडरे, सुखदेव कुकडे, तामदेव लटारे, बंडू जुआरे, धनराज वासेकर, शामराव गद्देवार आदी हजर होते.