गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरुमगाव येथे छापा टाकत सुमारे १० लाख १६ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी केली.
स्था व्यंकटेश बैरमवार (रा. मुरुमगाव, ता. धानोरा) हा आपल्या घरी बनावट देशी दारू तयार करून परिसरात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने मुरुमगाव बाजारमंडीजवळ सापळा रचला असता, संशयास्पद चारचाकी वाहन ( एमएच ३४ एव्ही- २०५१) आढळले. तपासणी केली असता, चोरकप्यात विदेशी व देशी दारूचा साठा सापडला. कारवाईत एकूण १० लाख १६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुरुमगाव ठाण्यात व्यंकटेश बैरमवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. तपास उपनिरीक्षक सचिन ठेंग करीत आहेत.
दुसऱ्या वाहनातून स्पिरीटचे ड्रमही जप्त
यानंतर जवळच उभे असलेल्या दुसऱ्या वाहनातून (एमएच ३३ टी- २०३५) मधून बनावट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे स्पिरीटने भरलेले दोन ड्रम (५०० किलो) जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपी बैरमवारच्या घराची तपासणी केल्यावर दारू तयार करण्याचे आणि सील करण्याचे उपकरणे व इतर साहित्य हाती लागले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक भगतसिंग दुलत, पो.ना. धनंजय चौधरी, अंमलदार राजू पंचफुलीवार व वृषाली चव्हाण यांच्या पथकाने केली. दारूबंदी असतानाही अवैध दारू तयार करून तयार करण्याचा गोरखधंदा सुरु होता.
Web Summary : Police in Gadchiroli, where alcohol is prohibited, raided a fake liquor factory, seizing ₹10 lakh worth of liquor and materials. The operation uncovered spirit drums and manufacturing equipment at the accused's residence.
Web Summary : गढ़चिरोली में पुलिस ने नकली शराब बनाने वाली फैक्ट्री पर छापा मारा, जहाँ शराबबंदी है। दस लाख रुपये की शराब और सामग्री जब्त की गई। आरोपी के घर पर स्पिरिट ड्रम और निर्माण उपकरण मिले।