शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By संजय तिपाले | Updated: November 12, 2025 20:42 IST

Gadchiroli : मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले.

गडचिरोली :  दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत चामोर्शी तालुक्यातील वालसरा गावात ११ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता मोठी कारवाई करण्यात आली. भाजपशी संलग्न असलेल्या स्थानिक नेत्याच्या घरातून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, प्रशासनातील अधिकारीसुद्धा चकित झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वालसरा येथील रामचंद्र केशव भांडेकर ( ३४, रा. वालसरा ता. चामोर्शी) हा आपल्या नातेवाईकाच्या घरात मोठ्या प्रमाणात देशी दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पो.नि.अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने सापळा रचत कारवाई केली. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतल्यावर ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९० मिली बाटल्यांचे ४५ खोके दारुसाठा आढळून आला.

मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले.

युवा मोर्चा पदाधिकारी व माजी जि. प. अध्यक्षांचे दीर

या प्रकरणातील आरोपी रामचंद्र भांडेकर हे भाजप युवा मोर्चाचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू मधुकर भांडेकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असून माजी जि.प. अध्यक्षा योगिता मधुकर भांडेकर यांचे ते दीर आहेत. तथापि, दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत सत्ताधारी नेत्याकडेच दारु आढळल्याने खळबळ उडाली आहे.

"मूळात मी गडचिरोली शहरात व भाऊ गावी राहतो. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आमची लोकप्रियता कमी करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र आहे. जप्त केलेली दारु इतरांच्या घरात आढळली, त्यामुळे यात भावाचा संबंध येतो कुठे, न्यायदेवता योग्य न्याय करेल."

- मधुकर भांडेकर, जिल्हाध्यक्ष भाजयुमो गडचिरोली

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leader's Illicit Liquor Stock Seized; Uproar in Gadchiroli

Web Summary : Gadchiroli police seized ₹3.6 lakh worth of illicit liquor from a BJP leader's house in Valsara. The accused, a local youth wing officer, was booked under prohibition laws, sparking political turmoil. The leader claims conspiracy.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीBJPभाजपाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकliquor banदारूबंदी