तळोधीजवळील घटना : दुचाकी पुलावरून कोसळलीतळोधी (मो.) : तळोधी-चामोर्शी या मुख्य मार्गावरील नाल्याच्या पुलावरून दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात रिपब्लिकन युथ फोरमचे राज्याध्यक्ष देवानंद वालदे हे ठार झाले. २४ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घना घडली.चामोर्शी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या तळोधी-चामोर्शी या मुख्य मार्गावरील तळोधीपासून दीड किमी अंतरावर असलेल्या नाल्याच्या पुलावरून भरधाव वेगाने गडचिरोलीकडे येत असताना दुचाकी बॉक्सर गाडी एमएच-३३-डी-९३६५ ला अपघात होऊन ती दुचाकी खाली कोसळली. या दुचाकीवरून जात असलेले देवानंद वालदे रात्रभर नाल्यात पडून राहिले. गुरूवारी सकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम बंदोबस्तासाठी जात असताना चामोर्शीचे पोलीस निरीक्षक अवचार यांना दुचाकी व मृतक इसम दिसून आला. त्यांनी घटनास्थळावरून बिट जमादार मरस्कोल्हे, देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ ताफ्यासह पोहोचून मोका पंचनामा केला व मृतकाचा मृतदेह व वाहन ताब्यात घेतले. यावेळी मृतकाजवळ तीन हजार रूपये रोख व डोळे तपासण्यासाठीचे कागदपत्र दिसून आले. ते याच कामासाठी गडचिरोलीला गेले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
आंबेडकर युथ फोरमचे राज्याध्यक्ष अपघातात ठार
By admin | Updated: February 26, 2016 01:50 IST