शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

राज्य शासन शहीद पोलीस परिवारांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

गेल्या १७ मे रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि पोलीस शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहात गृहमंत्र्यांनी आत्राम यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देगृहमंत्र्यांची ग्वाही; अहेरीचा दौरा करून शहीद शिपायाच्या कुटुंबीयांचे सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि.६) अहेरीचा दौरा करून १७ मे रोजी शहीद झालेल्या पोलीस जवानाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. राज्य शासन नक्षल्यांशी मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस परिवारांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला.गेल्या १७ मे रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि पोलीस शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहात गृहमंत्र्यांनी आत्राम यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम आदी उपस्थित होते.राज्यात कोरोना संसर्गजन्य आजाराचे थैमान सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभाग कोरोनासोबतच नक्षल्यांशी मुकाबला करून उत्तम कामगिरी बजावत असल्याचे कौतुकही गृहमंत्र्यांनी केले. नक्षल्यांशी आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया यावेळी ना.देशमुख यांनी दिली.शहीद परिवारातील सदस्याला नोकरीगृहमंत्र्यांनी अहेरीच्या या दौऱ्यात स्थानिक प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात शहीद पोलिसांच्या परिवारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. सर्वप्रथम शहीद जवान किशोर आत्राम यांची विरमाता, विरपत्नी, भाऊ, बहिनी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्य शासन शहीद कुटुंबीयांच्या पूर्णपणे पाठीशी राहणार असून अनुकंपा तत्वावर कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :Policeपोलिस