मागील वर्षी मका पीक निघूनही हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास उशीर झाला होता. त्यावेळी खासगी व्यापाऱ्यांकडून मका प्रतिक्विंटल ९०० ते १००० रुपये दराने खरेदी करण्यात आल्यानंतर पावसाला सुरुवात झाली त्यानंतर शासनाचे हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू झाले. येथे १७५० रु. प्रतिक्विंटल भाव घोषित करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ७५० ते ८५० रुपये नुकसान झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी मक्याची लागवड मागील वर्षापेक्षा अधिक प्रमाणात केली आहे. शासनानेही प्रतिक्विंटल १८५० रुपये हमीभाव घोषित केला आहे. पिकांची कापणी सुरू असल्याने आठ दिवसाच्या कालावधीत येथील सर्व हमीभाव केंद्र सुरू करावे तसेच अनेक हमीभाव धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल करण्यात उशीर होत असल्याने नवीन खरेदी करण्यात अडचणी आहेत. येथील धानाची उचल करीत उन्हाळी धान खरेदी केंद्रसुद्धा सुरू करावे व धान विक्रीचे अडलेले चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिश्चंद्र डोंगरवार, देवेंद्र मारगाये, माणीक मेश्राम, परमानंद बन्सोड, सखाराम करमकर, गौरसिंग ठेला, भगवानसिंग ठेला, प्रदीप मेश्राम, रैपाल ठेला, होमेश्वर मेश्राम, परदेशी सोनवानी, गुणाजी रक्षा, संतोष ठेला, नरेंद्र मारगाये, हिरजी सोनजाल, रामसिंग सोनजाल, कलिराम ब्रह्मनायक, सेवाराम ठेला, प्रशांत गोरठेकर, विठ्ठल मेश्राम व शेतकरी हजर होते.
तालुक्यातील हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST