शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण तयार शौचालयांना लावले स्टिकर

By admin | Updated: September 7, 2016 02:08 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता एटापल्ली पंचायत समितीला अचानक भेट दिली.

सीईओंची एटापल्लीला भेट : तोडसात आरोग्य केंद्र व शाळेची केली पाहणीएटापल्ली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता एटापल्ली पंचायत समितीला अचानक भेट दिली. त्यानंतर ते कसनसूर येथे गेले. तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन परत येताना तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली.तोडसा येथे स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या शौचालय बांधकामाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. तीन शौचालयांची पाहणी करून पूर्ण बांधकाम झालेल्या शौचालयांवर हिरवे स्टिकर लावण्यात आले. शौचालय बांधकाम करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन देऊन एटापल्ली येथे पंचायत समिती कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी अशोक इल्लुरकर यांच्यासह अधिकाऱ्यांशी विविध विकास कामांवर चर्चा केली व त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शंतनू गोयल यांनी तालुक्यात महिला बचत गटाचे कार्य उल्लेखनिय सुरू असून त्यांना प्रोत्साहन देऊन मदत केली जाणार आहे. तालुक्यात आठ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषीत करण्यात आल्या असून या ग्रामपंचायती अंतर्गत गावात शौचालय बांधकाम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन, १४ वा वित्त आयोग, आमचा गाव-आमचा विकास या योजनेंतर्गत तालुक्यात विकासकामे होणार असून आपण वारंवार भेटी देऊन या सर्व विकासकामांचा आढावा घेणार आहो, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच एटापल्ली तालुक्यात रस्ता दुरूस्तीच्या कामाकडेही लक्ष दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.सलगच्या शाासकीय सुट्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने कर्मचारी धास्तावलेल्या स्थितीत दिसले. रूजू झाल्यानंतर सीईओंचा हा पहिलाच एटापल्ली दौरा होता. एकूणच या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचीही चांगलीच तारांबळ उडाली. (तालुका प्रतिनिधी)