शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या वर्दळीने फुलू लागली एसटी बसस्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते.

ठळक मुद्देबसफेऱ्यांमध्ये वाढ। प्रवासाची बंधने हटविल्याने नागरिकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची सक्ती रद्द केल्यानंतर एसटीची चाके पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहेत. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढविली जात आहे.केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते. त्यामुळे बसला मर्यादीतच प्रवाशी मिळत होते. परिणामी बसफेऱ्याही मर्यादीत प्रमाणातच सोडल्या जात होत्या. २ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा प्रवासाची बंधने पूर्णपणे काढण्यात आली आहेत. तेव्हापासून एसटीची गरज नागरिकांना निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांची दुसऱ्या जिल्ह्यातील कामे थांबली होती. प्रवासाची बंधने हटविल्यानंतर ही कामे करण्यास वेग आला आहे. तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठीही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अधिक बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोली आगारातून शनिवारी नागपूरसाठी १०, चंद्रपूरसाठी १४, यवतमाळ १, चामोर्शी-मुलसाठी काही फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या जवळपास १०० फेऱ्या सोडल्या जात आहेत. सोमवारपासून नवीन आठवड्याला सुरूवात होणार असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुन्हा फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.१५ टक्के उत्पन्न व फेऱ्याआंतरजिल्हा प्रवासावरील बंधने हटविल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊनपूर्वी गडचिरोली आगारातून दरदिवशी ६२० बसफेऱ्या सोडल्या जात होत्या. त्यातुन जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत होते. आता जवळपास १०० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यातून १ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. सोमवारपासून नागपूरसाठी पुन्हा फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे फेºया जरी वाढल्या तरी उत्पन्न वाढीवर मर्यादा येणार आहेत. सध्या ४० ते ४५ एवढे भारमान मिळत आहे.

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी