शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दाेन हजार हेक्टर क्षेत्रावर वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्यात आगीच्या सर्वाधिक घटनांची नाेंद होते. विशेष म्हणजे ही आग पुढे कित्येक हेक्टर क्षेत्रावरील जंगलात पसरते. आगीमुळे लहान राेपटी नष्ट हाेतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : फेब्रुवारी ते मार्च या दाेन महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ९२२ फायर अलर्ट प्राप्त झाले आहेत. यामध्ये २ हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील जंगलालाआग लागली आहे. आगीमुळे जैवविविधतेचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्यात आगीच्या सर्वाधिक घटनांची नाेंद होते. विशेष म्हणजे ही आग पुढे कित्येक हेक्टर क्षेत्रावरील जंगलात पसरते. आगीमुळे लहान राेपटी नष्ट हाेतात. तसेच वन्यजीव, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटे नष्ट हाेतात. याचा फार माेठा फटका जैवविविधतेला बसतो. 

जागृती करूनही लावतात आगीमाेहाच्या झाडाखाली लावलेली आग पुढे जंगलात पसरते. यामुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. लाेकांनी आग लावू नये, याबाबत वनविभागामार्फत दरवर्षी जागृती केली जाते. झाडाखालील पालापाचाेळा झाडून दूर केले तरीही माेहाफुले वेचता येतात. मात्र, नागरिक असे न करता थेट आगी लावतात. 

सॅटेलाईट अलर्टने माेठी मदत-    एखाद्या ठिकाणी आग लागल्यास याबाबतचा संदेश सॅटेलाईटमार्फत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविला जाते. हा संदेश पुढे ज्या वनक्षेत्रात आग लागली आहे तेथील वनकर्मचाऱ्याला पाठविला जातो. त्यानंतर वनकर्मचारी त्या ठिकाणी पाेहाेचून आग विझवितात. सॅटेलाईटच्या संदेशामुळे आग वेळीच विझविणे शक्य झाले आहे.

वणवा लावणाऱ्यांवर कारवाईची गरज-    जे नागरिक जाणूनबुजून आग लावतात, अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे. कारवाई हाेत नसल्याने नागरिक आगी लावतात. यानंतर आता तेंदूपत्त्यासाठी आगी लावल्या जाणार आहेत. काही लाेकांवर कारवाई झाल्यास जंगलांना खुलेआम आगी लावण्याच्या प्रकाराला आळा बसेल. तसेच जे आगी लावतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

मागील वर्षीच्या तुलनेत कमी फायर अलर्टवनविभागाने ३१ मार्च राेजी आढावा घेतला असता, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फायर अलर्टची संख्या निम्म्याहून कमी असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ३१ मार्चपर्यंत १६ हजार ९९१ फायर अलर्ट प्राप्त झाले हाेते. यावर्षी फायर अलर्टची संख्या ६ हजार ९२२ एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० हजार ६९ फायर अलर्ट कमी आहेत. 

 

टॅग्स :fireआगforestजंगल