गडचिरोली : हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला यांनी छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने सोमवारी शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडचिरोली शहरातील सर्व शाळा सकाळपासूनच बंद होत्या. अनेक शाळांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी सुटी जाहीर केली. दुपारच्या पाळीतही शाळा, महाविद्यालय बंद होते. यावेळी युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत कुलगुरू, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राजीनामा देत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल, असे यावेळी जाहीर केले. गडचिरोली शहरात या आंदोलनात युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नंदू वाईलकर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमोल भडांगे, अनुसूचित जाती, जमाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, कुणाल पेंदोरकर, गौरव अलाम, नितेश बाळेकरमकर, तौफीक शेख, राहूल मुनघाटे, विवेक घोंगळे, अभिजीत धाईत, राकेश गणवीर, अजित घोरपडे, तुषार कुळमेथे, अजय कुमरे, सिध्दार्थ बांबाळे, पिंटू मेश्राम, साहिल पठाण, सौरभ नाकाडे, मकरंद रामटेके, आदित्य नमुलवार, जिग्नेश भोजानी, निचिकेत जंबेवार, विशाल देशमुख, नितीन डोईजळ, नागेश मडावी, अभिलाष बोबाटे, प्रफुल आचले, वृषभ धुर्वे, प्रतिक खोब्रागडे, मोहित मुंडके, पराग तुलावी, देवेंद्र हलामी, विनय उसेंडी, पियुष खोब्रागडे, शुभम मडावी, बालू मडावी, अमर नवघडे, कमलेश खोब्रागडे, प्रतिक बारसिंगे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी)आलापल्लीतही आंदोलनकाँग्रेस पक्षाच्या वतीने अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली येथे सोमवारी शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब अली यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बालाजी गावडे, महिला आघाडी अध्यक्ष उषा आत्राम, ग्रा.पं. सदस्य सलिम शेख, अरूणा गेडाम, बब्बू शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ४आरमोरी येथे आंदोलनाचे नेतृत्व विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सेवादल जिल्हा संघटक राजीव गारोदे, श्रीनिवास आंबटवार, चंदू वडपल्लीवार यांनी केले. आरमोरी शहरातील महात्मा गांधी महाविद्यालय, हितकारीणी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, किसनराव खोब्रागडे महाविद्यालय, विवेकानंद विद्यालय, आयटीआय, महात्मा गांधी उच्च माध्यमिक कन्या शाळा आदी कडकडीत बंद होत्या. यावेळी अंकूश गाढवे, आकाश सेलोकर, रोषण खोब्रागडे, आशिफ शेख, पंकज मोंगरकर, साबीर शेख, स्वप्नील दडमल, प्रमोद रामटेके, आकाश कांबळे, राकेश खेडकर, अमित गिरडकर, अमित हेमके, घनशाम कोडापे, मंगेश मानकर, रूपेश फुलबांधे, जितेंद्र सोमनकर आदी उपस्थित होते.४देसाईगंज, धानोरा येथेही युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येथील शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद होते.
शाळा, महाविद्यालय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: January 26, 2016 02:07 IST