शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणामार्गे कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात विशेष खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:56 IST

तेलंगणात रोजगारानिमित्त गेलेल्या मजुरांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

ठळक मुद्देतेलंगणा सरकारने केली व्यवस्थामजुरवर्गाला रोखले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरी आजुबाजूच्या काही जिल्ह्यांसह लगतच्या तेलंगणातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेलंगणात रोजगारानिमित्त गेलेल्या मजुरांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गडचिरोलीकडे येणाऱ्या मजुरांच्या लोंढ्यांना आता तेलंगणातच रोखले जात आहे.मिरची तोडाईसह शेतीच्या इतर कामांसाठी गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील मजूरवर्ग छत्तीसगडमध्ये गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर या मजुरांची कामेही बंद झाली. पण प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक मजुरांनी ३०० ते ४०० किलोमीटरचा पायी प्रवास करून आपले गाव गाठले. अजूनही अनेक मजूर तेलंगणात अडकून पडले आहेत. तेलंगणातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या मजुरांमार्फत गडचिरोलीत कोरोनाचे विषाणू येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाने त्यांना तेलंगणाच्या सिमेतच रोखण्याची सूचना तेथील प्रशासनाला केली आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणा सरकारनेही तिकडे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करून त्यांची उपासमार थांबविली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस