शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतितीव्र कुपोषित बालकांसाठी शासन पुरविणार विशेष आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:44 IST

राज्याच्या आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे.

ठळक मुद्देपुढील महिन्यापासून सुरूवातस्थानिक आहाराला मिळणार फाटा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे. हा पाकीटबंद आहार शासनमान्य पुरवठादाराकडून पुरविला जाणार असल्यामुळे आतापर्यंत स्थानिक पातळीवर दिला जाणारा आहार बंद होईल.राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचा शासन निर्णय गेल्यावर्षी ११ आॅगस्टला महिला व बालविकास विभागाने जारी केला होता. त्यात शासनाकडून आहार पुरवठा करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. मात्र काही बचत गटांच्या वतीने यासंदर्भात न्यायालयाकडे धाव घेतल्याने तो निर्णय स्थगित होता. आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये बालविकास केंद्र सुरू केले असले तरी त्यांना लागणारा आहार स्थानिक स्तरावरच बनविला जात होता. आता न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त पुरवठादाराकडून तो आहार पुरविला जाणार असल्याचे पत्र सर्व आदिवासीबहुल जिल्ह्यांना पाठविण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यात सध्या ५७५ अतितीव्र कुपोषित बालके आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात सर्वत्र नवीन आहार पुरविला जाणार आहे. या नवीन आहारामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण घटेल, अशी आशा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

असा असेल नवीन आहारजागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या शिफारसीनुसार तयार केलेल्या या नवीन आहारात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फोलिक अ‍ॅसिड, आयोडिन, फॅटी अ‍ॅसिड, साखर, शेंगदाण्याचा कूट असे घटक राहणार आहेत.

दिवसातून तीन वेळा खाऊ घालणारअंगणवाडीत येणाºया अतितीव्र कुपोषित बालकाला तेथील सेविका हा पाकीटबंद विशेष आहार दिवसातून किमान तीन वेळा खाऊ घालेल. शिल्लक राहिलेले पाकीट बालकाला घरी घेऊन जाण्यासाठी पालकाकडे दिले जाईल. दुसºया दिवशी ते रिकामे झालेले पाकीट अंगणवाडीत संबंधित पालकांकडून जमा केले जाईल. या बालकांच्या आहारावर शासन प्रतिदिन प्रतिबालक ७५ रुपयापर्यंत खर्च करणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार