शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

जुनी पेंशनसह इतर प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:00 AM

जुनी पेंशन याेजना लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना शाखा अहेरीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी प्रवीण टाेंगे, निशिकांत निमसरकार, भगवान मडावी, नारायण सिडाम, रहीम पठाण, अवधूत धनजे, ज्याेती आत्राम, सरस्वती अर्का, उद्धव गाेल्हार, राकेश श्रीरामवार, राजेंद्र दहीफळे, दुधराम कुमरे आदी उपस्थित हाेते. 

ठळक मुद्देबहुजन कल्याण मंत्र्यांना साकडे

  लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जुनी पेंशन याेजना लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना शाखा अहेरीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी प्रवीण टाेंगे, निशिकांत निमसरकार, भगवान मडावी, नारायण सिडाम, रहीम पठाण, अवधूत धनजे, ज्याेती आत्राम, सरस्वती अर्का, उद्धव गाेल्हार, राकेश श्रीरामवार, राजेंद्र दहीफळे, दुधराम कुमरे आदी उपस्थित हाेते. निवेदनात म्हटले आहे की, नवीन पेंशन याेजना कर्मचाऱ्यांना जशी नुकसानकारक आहे, तशीच ती सरकारसाठीही ताेट्याची आहे. त्यामुळे जुनी पेंशन याेजना लागू करावी, अशी मागणी आहे. निवेदनात, दहा वर्ष सेवा हाेण्यापूर्वी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये सानुग्रह अनुदान अदा करून वारसदारांना अनुकंपाचा लाभ देण्यात यावा, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वारसास फॅमिली पेंशन व ग्रॅज्युटीचा लाभ द्या, विषय शिक्षकासाठीची एक तृतीयांश वेतन श्रेणीची अट रद्द करून सर्वच शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, सर्व शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ काेणत्याही अटीशिवाय कायम ठेवण्यात यावा, विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत ना. विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डाॅ.नामदेव उसेंडी, जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व इतर पदाधिकारी उपस्थित हाेते.