शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मातृदिनाला पुत्रशोक, चार तरुणांचा बुडून मृत्यू; एकाला वाचविताना चौघांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 21:03 IST

चामोर्शी गावावरवर शोककळा.

लोमेश बुरांडे/चामोर्शी (जि.गडचिरोली) : हॉटेलात जेवण करुन पाच मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले,यावेळी खोल पाण्यात एक मित्र बुडत असल्याचे पाहून चौघे धावले. बुडत असलेल्या मित्राला वाचवले, पण नंतर ते चौघेही बुडाले. १४ मे रोजी सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना चामोर्शी शहरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

प्रफुल्ल विठ्ठल येलुरे (वय २०), महेश मधुकर घोंगडे (वय २०), शुभम रुपचंद लांजेवार (वय २४, तिघेही रा. प्रभाग क्र. ४ आशासदन टोली ,चामोर्शी), मोनू त्रिलोक शर्मा (वय २६, रा. गडचिरोली) अशी मयतांची नावे आहेत. हर्षल धोडरे (२२,रा.चामोर्शी) हा बालंबाल बचावला. हे पाचही जण मित्र होते.

रविवारी सुटीच्या निमित्ताने ते दुपारी एकत्रित आले. चामोर्शी शहराजवळील एका हॉटेलात त्यांनी जेवण केले. उन्हामुळे गरमी होऊ लागल्याने त्यांनी चिचडोह बंधाऱ्यात पाेहण्याचे ठरवले. त्यानुसार, पाचही जण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल धोडरे हा बुडू लागला, त्याच्या मदतीसाठी इतर चौघेही धावले. त्यांनी हर्षलला वाचविले, पण त्यानंतर चौघेही बुडाले. बुडताना वाचल्याने हर्षलला धाप लागली होती. जवळ इतर कोणी नसल्याने त्यांच्या मदतीला मात्र कोणी धावू शकले नाही.

नाकातोंडात पाणी गेल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, माहिती मिळताच चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे , उपनिरीक्षक सुधीर साठे , तुषार पाटील व अंमलदार यांनी धाव घेतली. मात्र, पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

नातेवाईकांच्या आक्रोशाने गहिरवले शहरया घटनेनंतर बंधाऱ्याजवळ नागरिकांनी तोबा गर्दी केली. चार तरुण मित्रांचे एका शेजारी मृतदेह ठेवले हाेते. हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीवेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरुन आले. संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते. आमदार डॉ.देवराव होळी यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे