शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोणाला हवी कार तर कोणाला बंगला, हुंडा नाही तर स्वखुशीने काहीतरी द्या; हुंड्याची बदलती व्याख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:10 IST

पोलिसांकडे तक्रारी वाढल्या : पळवाट काढून मागितला जातो हुंडा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबाने सुनेचा हुंड्यासाठी छळ केला होता. या छळाला त्रासून सुनेने आत्महत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीचा मुद्दा चर्चेला आला आहे. पैशाच्या लोभासाठी आणखी किती विवाहित महिलांचा जीव जाणार असा प्रश्न आहे. जिल्हाभरात महिन्याला अंदाजे ५० तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल होतात.

हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ होत असल्याची प्रकरणे घडल्यानंतर शासनाने हुंडा प्रतिबंधात्मक कायदा केला आहे. १९६१ मध्ये या कायद्याची निर्मिती झाली. यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. या कायद्यानुसार लग्नाच्या वेळी वरपक्षाकडून मागणी करून वधूपक्षाने दिलेले कोणतेही पैसे, वस्तू, स्थावर अथवा जंगम मालमत्ता ही 'हुंडा' म्हणून ओळखली जाते. हुंडा देणे किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर असून, त्यासाठी किमान ५ वर्षे तुरुंगवास आणि हुंड्याच्या मूल्याइतकी दंडाची शिक्षा होऊ शकते. विवाहानंतर सात वर्षाच्या आत महिला मृत झाल्यास आणि तो मृत्यू संशयास्पद वाटल्यास, त्याची चौकशी व शवविच्छेदन अनिवार्य आहे.

महिलांनी छळ होत असल्यास कुठे तक्रार करावी ?राज्य सरकार आणि केंद्र शासनाने महिलांना न्याय मिळावा म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. इथे पोलिस, वकील व महिला संघटनांचे सदस्य समाविष्ट असतात. पोलिस ठाण्यात महिला समुपदेशन केंद्र, महिला तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

हुंडा संस्कृती कधी थांबणार ?आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. अपवाद वगळला तर प्रत्येक महिला साक्षर आहे. तरीही तिचा हुंड्यासाठी छळ होतो. ही लाजिरवाणी बाब आहे. महिलांनी याबाबत आवाज उठवावा.

हुंडा म्हणून नाही, मात्र स्वखुशीने काहीतरी द्याकायद्यामुळे सरळ हुंडा मागितला जात नाही, पण अप्रत्यक्ष स्वरूपात मागणी केली जाते. विवाहापूर्वी "किती तोळे सोनं?" यावर चर्चा करून हुंडा ठरवला जातो. लग्न भव्य करावं, सर्व खर्च मुलीच्या घरच्यांनी करावा असा दबाव असतो. कार, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही अशा वस्तूंची "भेट" म्हणून मागणी. मुलाला शिक्षण किंवा नोकरीच्या दर्जानुसार "भेटवस्तू" ठरवणे. लग्नात वरात, डीजे आणि इतर खर्च मुलीच्या कुटुंबावर टाकणे. लग्नानंतर नवीन घरासाठी किंवा जमीन खरेदीसाठी पैशांची मागणी, हा एक प्रकारचा हुंडाच आहे.

"हुंड्यासाठी विवाहित महिलेचा छळ करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाने कायदा कठोर केला आहे. मात्र महिलावर्ग तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही."- वंदना जुआरे, सामाजिक कार्यकर्त्या.

टॅग्स :dowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाGadchiroliगडचिरोली