शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 06:40 IST

लाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले. 

गडचिरोली : जवानांविरुद्ध घातपाताचा कट रचणाऱ्या पाच जहाल माओवाद्यांना मंगळवारी भामरागडच्या बिनागुंडा गावातून ताब्यात घेतले. यात तीन महिलांचा समावेश आहे. अटकेतील तिघीही छत्तीसगडमधील आहेत. पाचजणांवर ३६ लाखांचे इनाम होते.माओवाद्यांच्या प्लाटून क्र. ३२ ची विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरू होयाम ऊर्फ सुमली (२८, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर), कमांडर पल्लवी केसा मीडियम ऊर्फ बंडी (१९, रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर), सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९, रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर) यांचा यामध्ये समावेश आहे. एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार अशी एकूण सात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

गोळीबार करणे टाळलेलाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले. संपूर्ण गावाला घेरून पाच संशयितांना शिताफीने पकडले. गावकऱ्यांना धोका पोहोचू नये म्हणून गोळीबार न करता जवानांनी मोहीम राबवली. काही माओवादी पळून गेले. 

तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसूचे आत्मसमर्पणसाडेतीन लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसू (२४, छत्तीसगड) या प्लाटून मेंबरने सोमवारी आत्मसमर्पण केले.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीSoldierसैनिक