शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

२२ गावांमध्ये लागले सौरदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांचा उपक्रम : दुर्गम भागातील गावे प्रकाशली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदर्श मित्र मंडळ, धनकवडी पुणे व श्रीलक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूर तसेच आधार फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी, भामरागड या तीन तालुक्यांमधील २२ गावांमध्ये सौरपथदिवे लावण्यात आले आहेत. पुन्हा जवळपास २५ गावांमध्ये अशा प्रकारचे पथदिवे लावले जातील, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही. प्रत्यक्ष वीज खांब गाडून वीज पोहोचविणे कठीण असल्याने या गावांना सौरदिवे वाटप करण्याचा निर्णय घेतला. २२ गावांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच पाच शाळांमध्येही पथदिवे लावले आहेत. तसेच १ हजार १३५ कुटुंबांना सौरदिवे देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी पुणे येथील अतुल बेहरे, मंदार बोरकर, दत्तात्रय दारवटकर, विश्वनाथ परदेशी, प्रसाद साप्ते, शारदाबाई नरवा, रत्नप्रभा गिरे, राजेश गिरे, श्रीस्वामी समर्थ ब्राह्मण सेवा संघ नारायणगाव, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे तसेच स्व. पंडीत वाघ, रूचा वैद्य, मोहन हुल्याळकर, उज्वला देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी मदत केली, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी दिली. पत्रकार परिषदेला श्रीनिवास सुंचूवार, चेतन गायकवाड हजर होते.ही आहेत सौरपथदिवे लागलेली गावे....भामरागड तालुक्यातील तुमरकोठ, तोयनार, मरकनार, मुरूमभिशी, खारडी, कोरपर्शी, कुचेर, मुतेरकुई, अहेरी तालुक्यातील कचलेर, हिनभट्टी, आंबेझरा, तोंडेल, येलचिल टोला, एटापल्ली तालुक्यातील आबारपल्ली, बुर्गी, गुंडापुरी, गोसूमटोला, मासूमटोला या गावांमध्ये वीज पोहोचविण्यात आली आहे.