शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोडेच्या आश्रमशाळेत चाललयं काय?, आणखी १७ जणांना विषबाधा; नाष्ता केल्यानंतर प्रकृती खालावली

By संजय तिपाले | Updated: December 21, 2023 13:26 IST

अन्न प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी घेतले नमुने

गडचिरोली: तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेत २० डिसेंबरला १०६ विद्यार्थ्यांना  दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली होती. या आश्रमशाळेतील आणखी १७ मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. २१ डिसेंबरला सकाळचा नाष्ता केल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला, त्यामुळे तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविले. एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२३ वर पोहोचली आहे.   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सोडे गावात  माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.  २० डिसेंबरला दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात  व गाजर खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. तब्बल १०६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ४८ तास या सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबरला सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाष्त्यात वटाण्याची उसळ दिली होती. ती खाल्ल्यानंतर १७ विद्यार्थ्यांना मळमळ, डाकेदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून उर्वरित ७६ जण धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या घटनेने आश्रमशाळेत स्वयंपाक बनविताना निष्काळजी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे काही अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात असून त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

अन्न नमुने पाठवले प्रयोगशाळेत 

दरम्यान, २० डिसेंबरला अन्न नमुने तपासणीसाठी घेेतले होते, २१ रोजी पुन्हा १७ जणांना विषबाधा झाल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील स्वयंपाकघरात भेट दिली. यावेळी तेथील वटाण्याच्या उसळचे नमुने तपासणीकामी घेतले आहेत. हे नमुने नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून अहवालाकडे सर्वांचे लक्ष आहे.