२९ एप्रिल १९५४ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी येऊन असंख्य लोकांना संबोधित केले होते. १९५७ मध्ये बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांनी अंदाजे पाच लक्ष अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा याच भूमीवर दिली. तेव्हापासून ही भूमी पदस्पर्शभूमी व दीक्षाभूमी म्हणून नावारूपास आली. या ६४ वर्षांदरम्यान शासन व प्रशासनातील अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्यात. महिला समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील सरकारने ‘क’ दर्जा प्रदान केला. त्यानंतर दीक्षाभूमीच्या सुशोभीकरणाकरिता एकूण रुपये ५४ लक्ष २० हजार ५१० रुपयांचे अनुदान मिळाले. यातून संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वार आदींचा यात समावेश आहे. परंतु याचदरम्यान १४ कोटी ७२ लक्ष ८६५ रुपयांचा निधी बुद्धविहार, ग्रंथालय, विपश्यना केंद्र, भिक्खू निवास आदी कामे करण्याकरिता निधी प्रस्तावित होता. मात्र हा निधी मिळाला नाही. ताे देण्याची मागणी हाेत आहे.
देसाईगंज दीक्षाभूमीच्या विकासाचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST