शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५०० किमीचा वळसा घालून जनावरांची तेलंगणात तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:31 IST

Gadchiroli : पोलिसांना गुंगारा दुर्गम भागातून कवडीमोल दराने खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. या पशुधनाला आता तस्करांची वक्र दृष्टी लागली आहे. दुर्गम भागातील पशुधन खरेदी करून सुमारे ५०० किमीचे अंतर पार करून तेलंगणा राज्यात तस्करी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातीलही पशुधन कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास ७८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे तसेच येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. ग्रामीण भागातील पशुंची संख्या कमी झाली असली तरी दुर्गम भागात अजूनही पशुधन कायम आहे. या पशुधनावर आता तस्करांची दृष्ट लागली असल्याचे दिसून येत आहे. तस्करांचे दलाल थेट गावापर्यंत पोहोचले आहेत. सदर दलाल गावातील जनावरे खरेदी करून एखाद्या मध्यवर्ती भागात आणतात. नंतर ही जनावरे एका वाहनात टाकून थेट गडचिरोली-मूल मार्गे तेलंगणात नेले जात आहे. 

ठोस कारवाई कधी ? विशेष म्हणजे अनेक पोलिस ठाणे पार करून या जनावरांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या या तस्करीकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तस्करांवर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

निवडणुकीच्या नाक्यांमुळे तस्करी थंडावली दुर्गम भागातील जनावरे प्रामुख्य गडचिरोली-मूल मार्गेच नेली जातात. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या सीमांवर पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वाहन तपासणी केली जात असल्याने काही दिवस तस्करी थांबली आहे. नाके हटताच पुन्हा तस्करीला सुरुवात होणार आहे.

या भागातून होते जनावरांची खरेदी ग्रामीण भागात पशुधन आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. दुर्गम भागातीलच पशुपालकांकडे पशुधन आहे. त्यामुळे तस्करांनी आपला मोर्चा आता दुर्गम भागाकडे वळवला असल्याचे दिसून येते आहे. कोरची तालुक्यातील काही गावे व धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या गावांमधून जनावरांची तस्करी केली जात आहे.

 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारGadchiroliगडचिरोली