गडचिरोलीतील ‘स्मृती उद्यान’ जात आहे विस्मृतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:54+5:302021-03-07T04:33:54+5:30

सरकारी क्वॉर्टर्सपासून जवळच असलेल्या या उद्यानाची उभारणी २०१३-१४ मध्ये करण्यात आली. मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्यांसोबत अनेक प्रकारच्या दुर्लभ वनस्पतींचे ...

The 'Smriti Udyan' in Gadchiroli is going into oblivion | गडचिरोलीतील ‘स्मृती उद्यान’ जात आहे विस्मृतीत

गडचिरोलीतील ‘स्मृती उद्यान’ जात आहे विस्मृतीत

googlenewsNext

सरकारी क्वॉर्टर्सपासून जवळच असलेल्या या उद्यानाची उभारणी २०१३-१४ मध्ये करण्यात आली. मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्यांसोबत अनेक प्रकारच्या दुर्लभ वनस्पतींचे रोपटेही त्या ठिकाणी होते. आता त्या रोपट्यांच्या फक्त पाट्या शिल्लक आहेत. उद्यानात फेरफटका मारल्यानंतर मन प्रसन्न व्हावे यासाठी छोटेखानी तलाव, कारंजे, लाकडी पूल अशा बऱ्याच गोष्टी बनविल्या होत्या. पण आज ते सर्व मोडकळीस आले आहे. त्यामुळे या बगिचाकडे आता कोणी फारसे फिरकत नाही. याचाच फायदा घेत प्रेमीयुगुल मात्र गार्डनमध्ये झुडुपांच्या आश्रयाने गुजगोष्टी करताना दिसतात.

या गार्डनमध्ये प्रतिव्यक्ती दहा रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. पण बगिचाची दुरवस्था पाहता तेवढे शुल्कही देण्याची कोणाची इच्छा होत नाही. त्यामुळे प्रेमीयुगुलांशिवाय इतर कोणाचे पाय या बगिचाकडे वळत नाही. या उद्यानातील काही झाडे कुऱ्हाडीने तोडल्याचे दिसून आले. काही ठिकाणी गवत चक्क जाळण्यात आले. त्याची आस इतर चांगल्या झाडांना लागून ते मरनासन्न झाले आहेत. कहर म्हणजे या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्याही उघडपणे पडलेल्या दिसून आल्या. बगिचातील आडोशाला असलेल्या झुडुपांमध्ये तर अशा अनेक आक्षेपार्ह बाबी आढळू शकतात.

या उद्यानाच्या देखभालीसाठी पैसाच उपलब्ध होत नसल्यामुळे त्याची दुरवस्था झाली असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. व्ही. कैलुके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी या उद्यानाला नवीन रूप देण्याचा निश्चय केला असून, त्यासाठी पैसेही उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The 'Smriti Udyan' in Gadchiroli is going into oblivion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.