शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा, हवेत गोळीबार करताच तस्कारांचा पोबारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:37 IST

सिरोंचात मध्यरात्री उडाली चकमक: सात बैलगाड्यांसह ३१ लाकडे जप्त

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : मध्यरात्री सागाची तस्करी करणाऱ्यांनी गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा वर्षाव केला. प्रत्युत्तरात वनकर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्यावर तस्करांनी बैलगाड्या जागीच सोडून पोबारा केला. सिरोंचा वनपरिक्षेत्रातील चिटूर ते दुब्बापल्ली जंगलात हा थरार झाला.

 सिरोंचा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनकर्मचारी व आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी संयुक्त गस्त घालत होते. दुब्बापल्ली जंगलात कर्मचारी पाळत ठेवून असताना २४ मार्च रोजी मध्यरात्री एक वाजता सागतस्कर बैलबंडीमध्ये साग लठ्ठे भरुन येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सागतस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर दंगडांचा मारा करीत हल्ला केला. साग तस्करांना पांगविण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी पिस्तलमधून हवेत गोळीबार केला. यावेळी  सागतस्कर बैल व बंड्या सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.    सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षे अधिकारी पी.एम. पाझारे,  आर.डी.तोकला, वनपाल एम.बी.शेख, एस.एस. नीलम, वनरक्षक आर. के. शेरकी, ए.एस. नैताम, आर. वाय. तलांडी, पी.टी. दर्रो, एम. जे. धुर्वे, वाहनचालक आर. बी. आत्राम, ए. जी. आत्राम तसेच आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आर. पी. गेडाम, ए.डब्ल्यू. तलांडी, सी. पी. दुर्गे तसेच रोजंदारी वनमजूरांनी पार पाडली.

अधिकाऱ्यांनी काढली रात्र जागून

घटनास्थळावरुन १४ बैल, ७ बैलगाड्या व सागाची ३१ लाकडे असा मुद्देमाल जप्त केला. मध्यरात्री एक वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांनी रात्री जागून काढत ही कारवाई केली. जप्त केलेला माल डेपोमध्ये हलविण्यात आला असुन पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. पाझारे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीforest departmentवनविभागGadchiroliगडचिरोली