शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांचे मानधन थकले, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:16 IST

प्रशासनाकडून होतेय दिरंगाई : जिल्ह्यातील आठशेवर कुंटुंबे आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचे सहा महिन्यांचे मानधन थकीत असून, मानधन अदा करण्याबाबत गतीने कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांचे आठशेवर कुंटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत.

कर वसुलीची अट रद्द करण्यात यावी. आकृतिबंधात सुधारणा करावी, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांचे थकीत असलेले मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गडचिरोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात कर्मचाऱ्यांनी दिले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५८ ग्रामपंचायती असून, यामध्ये जवळपास ८१४ कर्मचारी नियमित मासिक मानधनावर काम करीत आहे. यामध्ये लिपीक, पाणीपुरवठा कर्मचारी, तसेच शिपाई आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ चे थकीत वेतन, तसेच ९ महिन्यांचे (सप्टेंबर २०२० ते मे २०२१) पर्यंतच्या फरकाची रक्कम (एरिअस) दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कराव्या, असे निवेदनात म्हटले आहे. 

ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, आम्हा कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते सप्टेंबर २०२४ चे थकीत वेतन, तसेच ९ महिन्यांचे (सप्टेंबर २०२० ते मे २०२१) पर्यंतचे फरकाची रक्कम (एरिअस) अजूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली असून , मानसिक संतुलन ढासळले यापूर्वी आपल्या स्तरावरून पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांचे वेतन अदा करण्यात आलेले होते. परंतु, पंचायत समिती स्तरावरून प्रत्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांच्या वैयक्तिक खात्यात रक्कम जमा न करता काही पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतच्या सामान्य निधी खात्यात रक्कम जमा केलेली आहे, त्यामुळे अद्यापही ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांना रक्कम मिळालेली नाही.

ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या जिल्हा परिषद स्तरावरून सूचना पंचायत समित्यांना देण्यात यावी. जेणेकरून दिवाळीपूर्वी रक्कम उपभोगण्यास मिळेल, अशी मागणी ग्रा. प. कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळेना ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लोकसंख्येच्या आधारावर मानधन दिले जाते. शासनाकडून मानधन मिळत असले तरी ते मानधन तुटपुंजे असून ते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. प्रशासकीय दिरंगाई याला कारणीभूत आहे.

"गेल्या सहा महिन्यांपासून आम्हा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित आहे. शासनाकडून निधी येत असला तरी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया दिरंगाईची आहे. आम्ही ग्रा.पं. स्तरावर कोरोना काळात काम केले. आत्ताही सक्रीय आहोत. मात्र मानधन वेळेवर मिळत नसल्याने मनोबल खचते. आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते."- खुमेश हर्षे, अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, तालुका गडचिरोली

"पूर्वी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे मानधन कर्मचाऱ्यांच्या बचत खात्यात वळते केले जात होते. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात चुका असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने ग्रामसेवकाच्या खात्यात ही रक्कम वळती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सहा महिन्यांपासूनचे मानधन आमच्या खात्यात तातडीने देण्यात यावे. अशी आमची मागणी आहे." - गुरुदेव नैताम, सचिव, कर्मचारी युनियन, तालुका गडचिरोली. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली