शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बैलबंडी व कारसह सहा लाख सात हजारांची दारू जप्त

By admin | Updated: July 7, 2015 01:22 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे तीन लाख सात हजारांची दारू बैलबंडीतून आणताना तर देसाईगंज तालुक्यात ...

आसरअल्ली व एकलपुरात कारवाई : आसरअल्लीत दारू गाळण्याच्या साहित्याची विक्री वाढलीगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे तीन लाख सात हजारांची दारू बैलबंडीतून आणताना तर देसाईगंज तालुक्यात एकलपूरजवळ कारमधून गोंदिया जिल्ह्यात कारसह तीन लाखांची दारू आणताना पोलिसांनी पकडली. तेलंगणा व महाराष्ट्र सीमेजवळ सिरोंचा तालुक्यात असलेल्या आसरअल्ली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोटला टेकडा येथे बैलबंडीतून अवैधरित्या दारू आणत असताना तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ७ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. मोटला टेकडा येथून आसरअल्लीकडे बैलबंडीने दारू आणत असताना हिरामल्लू बोतय्या भिमकरी, चंद्रम अर्जना चौधरी, अंकलू बापू दाते, रा. सर्व आसरअल्ली यांना ताब्यात घेण्यात आले. तर चौथा इसम गणेश चंद्रय्या पाले हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. या तीन आरोपींना अटक करून बैलबंड्या व विदेशी दारू ३ लाख ७ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पवार व ठाणेदार खाटपे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक नागराज बिराजदार, पोलीस हवालदार दिलीप इनमुलवार, पोलीस शिपाई हेमंत राऊत, शुक्राचार्य गवळी यांनी पार पाडली. आसरअल्ली परिसरात गुळाची तस्करी वाढलेली असून येथील काही सावकार गुळ व दारू बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू अवैधरित्या पुरवठा करीत आहे.तर दुसऱ्या एका कारवाईत येथील दारुबंदी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी देसाईगंज तालुक्यातील एकलपूर येथे सापळा रचून गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या दीड लाखांच्या दारुसह ३ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन जप्त केले. याप्रकरणी चंदर पुतुलाल जाट, सतीश विक्रम अहेरवार दोघेही रा. जबलपूर यांना अटक करण्यात आली असून, गोंदिया येथील दारु दुकानमालक व कानपूर दिलीप जाट यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. देसाईगंज तालुक्यातील गौरनगर, अरुणनगरमार्गे गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारु आणण्यात येत असल्याची माहिती मिळताच जिल्हा दारुबंदी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांच्या नेतृत्वातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी एकलपूर फाट्याजवळ सापळा रचला. यावेळी समोरुन येणारी पांढऱ्या रंगाची चारचाकी कार गाडी थांबवून तिची तपासणी केली असता, त्यामध्ये टँगो पंच कंपनीची १ लाख ४२ हजारांची देशी दारु, रोख ६ हजार रुपये आढळून आले. पोलिसांनी या दारुसह ३ लाख रुपये किमतीची कार गाडी जप्त केली. याप्रकरणी वाहनातील चंदर पुतुलाल जाट व सतीश विक्रम गहेरवार यांना ताब्यात घेण्यात आले. ही दारु गोंदिया जिल्हयातील दारु दुकानाच्या मालकाकडून आणली असून, ती चंद्रपूर येथील कानपूर दिलिप जाट याच्या सांगण्यावरुन चंद्रपूरला नेण्यात येत होती, असे दोघांनी सांगितले. चारही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई विनायक कोळी यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)