शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

आमगाव येथे सहा जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:46 IST

रामनवमीचे औचित्य साधून आमगाव येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण सहा जोडपी विवाहबध्द झाली.

ठळक मुद्दे१९९९ पासून उपक्रम : आजपर्यंत सुमारे १०५ जोडप्यांचे लागले लग्न, इतर गावांसाठी प्रेरणादायी उपक्रम

आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : रामनवमीचे औचित्य साधून आमगाव येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण सहा जोडपी विवाहबध्द झाली.या विवाह सोहळ्याला आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नाना नाकाडे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सरपंच योगेश नाकतोडे, पं.स. सदस्य रेवता अलोणे, शेवंता अवसरे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड. संजय गुरू, सतपाल नागदेवे, ईश्वर कुमरे, लोकमान पिलारे, सावंगीचे सरपंच राजू बुल्ले, भाग्यवान खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.श्री हनुमान बहुउद्देशीय सेवा समिती आमगावच्या वतीने सन १९९९ पासून राम नवमीनिमित्त सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. या विवाह सोहळ्यात आतापर्यंत १०५ जोडपी विवाहबध्द झाले आहेत. आमगाव येथील राम मंदिर आमराईने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात आहे. या विवाह सोहळ्याचे आयोजन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण देशमुख, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विनोद जक्कमवार यांच्या संकल्पनेतून केले जात आहे. रामनवमीनिमित्त सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून जपली जात आहे. सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. आमगाव येथील या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याने याचा फायदा समाजाला होतो. अशा प्रकारचे उपक्रम इतरही गावांनी राबवावे. यामुळे लग्नांवर होणारा अनावश्यक खर्च कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. लग्न मंडपाच्या परिसरात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक लावण्यात आले होते. सदर फलक लक्ष वेधून घेत होते.