शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‎अवैध वाळू उत्खननात निष्काळजी भोवली, ‎सिरोंचा तहसीलदार निलेश होनमोरे निलंबित!

By संजय तिपाले | Updated: November 7, 2025 16:06 IST

‎मोठी कारवाई: तलाठ्यांच्या अहवालाकडे केले होते दुर्लक्ष

गडचिरोली : सिरोंचातील अंकिसा परिसरातील अवैध वाळू उपसा, साठेबाजीच्या प्रकरणात अखेर ७ नोव्हेंबरला  तहसीलदार नीलेश होणमोेरे यांचे निलंबन करण्यात आले. 'लोकमत'ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी तातडीने खुलासा करुन गैरव्यवहार नसल्याचा दावा केला होता. मात्र, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चाैकशीचे आदेश दिले. त्यानंतर तलाठी, मंडळाधिकाऱ्यांचे निलंबन केले होते.

‎मद्दीकुंठा (ता. सिरोंचा) येथील सर्वे क्र. ३५६ मधील अवैध रेतीसाठ्याबाबत उघडकीस आलेल्या प्रकरणात   प्रशासनातील अंतर्गत दुर्लक्षाचा मुद्दा चव्हाट्यावर आला होता. तहसीलदारांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना नगरम साजा क्र. ८ च्या तलाठी अश्विनी सडमेक यांनी लागोपाठ सहा अहवाल  दिले, मात्र तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप केल्याचे उघडकीस आले होते. तलाठ्यांनी पोलखोल केल्याने आता तहसीलदार होणमोरे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तलाठी, मंडळाधिकाऱ्यांवर कारवाई करुन वरिष्ठांना पाठीशी घातल्याचा आरोप देखील झाला होता. 

विभागीय चौकशीसह निलंबनाचा दणका‎‎शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी निलंबन आदेश जारी केले. या प्रकरणात प्राथमिक चौकशीदरम्यान मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून,  होनमोरे यांना निलंबन काळात जिल्हाधिकारी कार्यालय हे मुख्यालय दिले आहे. 

‎२९ कोटींचा दंड केला होता प्रस्तावित

अंकिसा परिसरातील मद्दीकुंठा व चिंतरवेला येथे १५ हजार ६६५ ब्रास अवैध वाळू साठा आढळला होता.. यानंतर तलाठी अश्विनी सडमेक व मंडळाधिकारी राजू खोब्रागडे यांचे निलंबन झाले होते. तहसीलदार नीलेश होणमोरे यांच्या बदलीची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.बेकायदेशीर वाळू साठा प्रकरणी संबंधितांवर तब्बल २९ कोटींचा दंड प्रस्तावित केला होता. हा दंड वसूल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sironcha Tehsildar Suspended for Negligence in Illegal Sand Mining Case

Web Summary : Sironcha's Tehsildar Nilesh Honmore suspended after illegal sand mining uncovered. Negligence in Maddikuntha exposed internal administrative flaws. Prior suspensions occurred for involved Talathi and Mandal officers. A fine of ₹29 crore was proposed.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMining Scamखाण घोटाळाsandवाळू