शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

सिरोंचा रूग्णालयाची धर्मशाळा बेवारस

By admin | Updated: February 9, 2015 23:13 IST

सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेल्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली धर्मशाळा सध्या बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेल्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली धर्मशाळा सध्या बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालयासमोर धर्मशाळेची इमारत आहे. मागील अनेक वर्षांपासून ही इमारत बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येते. काही काळ सदर धर्मशाळा एका पागल महिलेने आपले निवासस्थान बनविले होते. सध्या ही धर्मशाळा जनावरांचा गोठा झालेली आहे. धर्मशाळेच्या सभोवताल झाडेझुडपे वाढलेले असून सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. धर्मशाळेची इमारत स्लॅबची असून ती सुस्थितीत आहे. या धर्मशाळेच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाच्या कोणत्याही विभागाचे लक्ष नाही. धर्मशाळा इमारतीची आतून बाहेरून स्वच्छता करून सदर इमारत रूग्णांच्या नातेवाईकांना वापरण्यासाठी करारी किंवा भाडे तत्वावर द्यावी, अशी सिरोंचा येथील नागरिकांची मागणी आहे. रूग्णालयात आसरअल्ली, अंकिसा, झिंगानूर, पातागुडम, मोयाबिन पेठा, रेगुंठा आदी भागातून रूग्ण येतात. त्यांना सिरोंचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर नातलगांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. धर्मशाळा सुरू झाल्यास रूग्णांच्या नातेवाईकांना सुविधा उपलब्ध होईल. (शहर प्रतिनिधी)