आता ५ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:24+5:30

सर्व कँटिन, चित्रपटगृहे, मॉल, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृह आदी बंदच राहतील. निवासाची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, खासगी विश्रामगृहही बंद राहतील. धार्मिक स्थळे नागरिकांकरिता बंद राहतील. पानटपरी आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद राहतील.

Shops will now be open until 5 p.m. | आता ५ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने

आता ५ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने

Next
ठळक मुद्दे१ ते ३१ जुलैसाठी नवीन निर्देश : रविवारच्या बंदमधून कृषी केंद्रांना वगळले, मास्क नसल्यास दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनलॉक प्रक्रियेत १ ते ३१ जुलै या कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामध्ये जिल्हाभरातील सर्वच प्रकारची दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. रविवारला आधीप्रमाणेच सर्व दुकाने बंद ठेवली जातील. मात्र त्यातून कृषी केंद्रांना वगळण्यात आले आहे.
सर्व कँटिन, चित्रपटगृहे, मॉल, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृह आदी बंदच राहतील. निवासाची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, खासगी विश्रामगृहही बंद राहतील. धार्मिक स्थळे नागरिकांकरिता बंद राहतील. पानटपरी आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क किंवा रूमालविना आढळून आल्यास दंडनिय कारवाई केली जाईल. दैनंदिन बाजार भरविण्यास परवानगी आहे. मात्र आठवडी बाजार भरवता येणार नाही.
अंत्यसंस्काराला अजूनही २० पेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी राहणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणाºया प्रकल्पांना वेळेचे बंधन लागू राहणार नाही. जिल्ह्यातील सर्व रूग्णालये, पॅथॉलॉजी सेंटर, सोनोग्रॉफी सेंटर, केमिस्ट यांना वेळेचे बंधन राहणार नाही.
आॅटोरिक्षा, सायकलरिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एक चालक व दोन प्रवासी घेऊन वाहतूक सेवा सुरू राहिल. खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांच्याशी संबंधित उद्योग, दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. केशकर्तन, हेअर डायिंग, वॅक्सिंग, थ्रेडींग करता येईल. मात्र दाढी किंवा चेहºयाशी संबंधित कामे प्रतिबंधीत राहतील. तशा प्रकारचे फलक ग्राहकांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावे लागणार आहे.
केशकर्तनाचे काम करणाºया व्यक्तीने हॅन्डग्लोज, अ‍ॅप्रॉन व मास्क घालणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. सर्व विभागातील कर्मचाºयांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

आंतरजिल्हा प्रवासावरील बंदी कायम
जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यास कोणतेही बंधन राहणार नाही. मात्र एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाण्यास किंवा येण्यास परवानगीची आवश्यकता अजूनही आहे. जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने प्रशासकीय कारणास्तव प्रवास करता येईल. सक्षम अधिकाºयाची परवानगी घेऊन दुसºया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तीला आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार १४ दिवस होम क्वॉरंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ५० टक्के प्रवासी घेऊन जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची सूचना आहे. मात्र एसटी महामंडळाकडून अजूनही मोजक्याच मार्गावरील काही बसेस सोडल्या जात आहेत.

अहेरी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी एक पॉझिटिव्ह
धानोरा येथील संस्थात्मक विलगीकरणातील २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहेरी येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये नोकरी करणाºया ५२ वर्षीय कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हैदराबादवरून आल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. अहेरी तालुक्यातील एका रूग्णाची कोरोनापासून मुक्ती झाली आहे.

Web Title: Shops will now be open until 5 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार