शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

४ वाजेपर्यंत राहणार जिल्ह्यातील दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

१ ते ३० जून या कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासाला कोणत्याही पासची गरज नाही. बाहेर राज्यातून किंवा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर परवानगी आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या  व्यक्तींना १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण राहणे बंधनकारक करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे नवीन निर्देश : सलून बंदच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुकाने उघडणे व बंद करण्याच्या कालावधीत बदल करण्यात आला असून आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सोमवार ते शनिवारपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. रविवारी संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.१ ते ३० जून या कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासाला कोणत्याही पासची गरज नाही. बाहेर राज्यातून किंवा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर परवानगी आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या  व्यक्तींना १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण राहणे बंधनकारक करण्यात आले. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था बंद राहतील. ऑनलाईन पध्दतीने शिक्षण चालू ठेवता येईल. सर्व कॅन्टीन सेवा बंद राहिल. उपहार गृहे, स्वीट मार्ट, फरसान सेंटर, चहा, नाश्ता सेंटर सुरू राहतील. या दुकानांमध्ये ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था राहणार नाही. पार्सल देता येईल. चित्रपट गृहे, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृह, सभागृह बंद राहतील.निवासाची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, खाजगी विश्रामगृह बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थयळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच अशा ठिकाणी धार्मिक एकत्रिकरणाला कडक निर्बंध असतील. पान टपरी, तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने इत्यादी बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. शारीरिक अंतर राखुन केवळ दैनंदिन बाजार भरविण्यास परवानगी देण्यात येत आहे. विवाहाच्या कार्यक्रमास कमाल ५० लोकांच्या मर्यादेत कार्यक्रमास परवानगी असेल. अंत्यसंस्काराच्या बाबतीत २० पेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल. रात्री ९ ते सकाळी ५ या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर निघण्यास नागरीकांना मज्जाव करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अखत्यारीतील जिल्हातंर्गत बसेस सुरु करण्यात येवून कमाल प्रवास धारण क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. डिझेल-पेट्रोलची विक्री, खरेदीसाठी तहसिलदार यांचेकडून परवाना (पासेस)ची आवश्यकता असणार नाही. जीवनावश्यपक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प चालू राहतील व त्यांना वेळेच बंधन लागू राहणार नाही. मास्क, रुमाल बांधुन असलेल्या ग्राहकांनाच केवळ दुकानात एका वेळेस कमाल पाच व्यक्तींना प्रवेश द्यावा. दुकानामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे पालन न केल्यास दुकान सील करण्यात येईल. आॅटो रिक्षा व सायकल रिक्षामध्ये एक चालक दोन प्रवासी याप्रमाणे वाहतूक सेवा सुरु राहतील.प्रतिबंधीत क्षेत्र वगळलेकुरखेडा, चामोर्शी व मुलचेरा येथे १८ मे रोजी कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कुरखेडातील काही भाग, येंगलखेडा, नेहार पायली, चिंचेवाडा ही गावे, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, आश्रमशाळा परिसर, मुलचेरा तलुक्यातील विश्वनाथनगर गावाचा काही भाग प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केला होता. सदर रूग्ण ज्या क्षेत्रात राहत होते. त्या क्षेत्राला जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले होते. १८ मे पासून या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी नियमित लक्ष ठेवून होते. या ठिकाणी एकही कोरोना बाधीत आढळून न आल्याने १ जूनपासून सदर क्षेत्र प्रतिबंधीतमधून वगळले आहे.१०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्यसर्व विभागातील विभाग प्रमुखांनी त्यांचे विभागातील १०० टक्के कर्मचाºयांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक स्थळी तसेच कामाचे ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन होत असल्याच्या नियमाची खात्री करावी. कोणतीही संस्था अगर व्यवस्थाापक हे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांचा जमाव होऊ देणार नाही, याची खबरदारी संबंधितांना घ्यायची आहे.

टॅग्स :Marketबाजार