शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

By संजय तिपाले | Updated: May 9, 2024 20:48 IST

सर्जन, फिजिशियन नसल्याने उपचारात हलगर्जी

गडचिरोली :  अवघ्या चार दिवसांच्या अंतराने येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या  दोन मातांचा   मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ९ मे रोजी उघडकीस आली. या रुग्णालयात सर्जन व फिजिशियन उपलब्ध नव्हते, त्यामुळे महिलांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे दुर्गम व मागास भागात आरोग्यसेवेचा कसा बोजवारा उडालेला आहे, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.  सरिता संतोष तोटावार (२४,रा.चिंचगुंडी ता. अहेरी) व नागूबाई जितेंद्र कोडापे (२३,रा.वडलापेठ ता. अहेरी) अशी मृत मातांची नावे आहेत. दोघींचीही नवजात बालके सुखरुप आहेत. सरिता ही प्रसववेदना जाणूव लागल्याने ३ मे रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिची डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला हृदयरोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर ४ मे रोजी ती कुटुंबासोबत घरी गेली व घरीच तिची प्रसूती झाली. मात्र, प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने तिला नातेवाईकांनी ५ रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती खालावलेली होती, त्यांनाही जिल्हा रुग्णालयात रेफर केले, पण गडचिरोलीत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. 

नागूबाई कोडापे ही २३ एप्रिलला उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्याच दिवशी प्रसूती झाली. २५ रोजी माता व बाळ सुरक्षित असल्याने सुटी दिली. मात्र, १३ दिवसांनी अचानकच नागूबाईची प्रकृती खालावली. त्यामुळे ती उपजिल्हा रुग्णालयात भरती झाली. उपचारासाठी फिजिशियन व सर्जन उपलब्ध नसल्याने तिला दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली.  

दोन्ही चिमुकले मातृप्रेमाला पारखेसरिता तोटावार व नागूबाई कोडापे या दोघींचीही दुसरी प्रसूती होती. दोघींनीही मुलाला जन्म दिला होता. चार दिवसांच्या अंतराने दोघींचाही मृत्यू झाला. त्यामुळे निरागस चिमुकले मातृप्रेमाला पारखे झाले आहेत.

दोन्ही प्रकरणांत उपचारासाठी फिजिशयन गरजेचे होते. या रुग्णालयात फिजिशियन उपलब्ध नव्हते. हे पद रिक्त असल्याने त्या दोघींनाही रेफर केल्याखेरीज पर्याय नव्हता. रिक्त पदे भरावीत, यासाठी प्रयत्न सुरु आहे.- डॉ. कन्ना मडावी अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली