शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

अन् प्रेमासाठी पत्नीनेच केला पतीचा 'गेम'; प्रियकराच्या मदतीने हत्या, 'असा' झाला उलगडा

By संजय तिपाले | Updated: October 14, 2023 16:54 IST

दवंडी प्रकरणाला धक्कादायक कलाटणी: तिघांना अटक, बेडगाव पोलिसांनी केला उलगडा

गडचिरोली : कोरची तालुक्यातील दवंडी गावातील एका किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या केल्याची घटना ११ ऑक्टोबरला रात्री घडली होती. या सिनेस्टाइल खुनाचा उलगडा करण्यात अखेर बेडगाव पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर व अन्य एकाच्या मदतीने नियोजनबध्दपणे काटा काढला. १३ ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.

लखन सुन्हेर सोनार (वय ३८) असे मृताचे नाव आहे.  त्यांचे गावात किराणा दुकान होते. ११ ऑक्टोबरला रात्री मारेकऱ्यांनी दरवाजाची कडी ठोठावली. पत्नीने दरवाजा उघडल्यावर तिला ढकलून देत तोंडाला काळे कपडे बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी खाटेवर झोपलेल्या लखन यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर मारेकऱ्यांनी पोबारा केला. पाच ते सहा जण तोंडाला काळे कपडे बांधून आले होते. पत्नी सरिता हिने अशा आशयाची फिर्याद दिल्यावरुन अज्ञात पाच ते सहा इसमांविरोधात बेडगाव पोलिस मदत केंद्रात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गावात काही वर्षांपूर्वी दोन निरपराध व्यक्तींची नक्षल्यांनी हत्या केली होती, त्यामुळे पोलिस सर्व बाजूंनी तपास करत होते. अखेर या प्रकरणात फिर्यादी असलेली पत्नी सरिताने प्रियकर बळीराम गावडे (रा. कुडकेल ता. कोरची) व त्याचा सहकारी सुभाष नंदेश्वर (रा.दवंडी) याच्या मदतीने पती लखनची हत्या घडवून आणली.  पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. १४ ऑक्टोबर रोजी त्यांना कोरची न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 

वडील गेले, आई तुरुंगात, दोन भावंडे प्रेमाला पारखी

अनैतिक संबंधातून झालेल्या हत्याकांडाने या कुटुंबाची वाताहत झाली. लखन हे जिवानिशी गेले. पत्नी सरिता कारागृहात गेली. या दाम्पत्यास दोन आपत्ये आहेत. मुलगी पायल (१६), मुलगा प्रणय (१२) हे जन्मदात्याच्या प्रेमाला पारखी झाली आहेत.

त्या रात्री नेमके काय घडले?

१३ ऑक्टोबरच्या रात्री सरिता व लखन एका खोलीत झोपले होते. मुलगी पायल व व मुलगा प्रणय हे वेगळ्या खोलीत होते. सरिता व बळीराम गावडे यांचे अनैतिक संबंध होते. त्यात लखन अडथळा ठरत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी त्याचा खून करण्याचा कट पत्नी सरिता व बळीराम गावडे यांनी रचला, त्यासाठी सुभाष नंदेश्वरचीही मदत घेेतली. आधीच ठरल्याप्रमाणे सरिताने रात्री झोपताना घराच्या दरवाजाची आतून कडी न लावता फक्त लोटून घेतला. त्यानंतर दारुच्या नशेत बळीराम गावडे व सुभाष नंदेश्वर यांनी घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने झोपेतच लखनच्या गळ्यावर वार करुन निर्घृण हत्या केली.  मारेकरी पळून गेल्यावर सरिताने आरडाओरड करुन अज्ञातांनी पतीला संपविल्याचा बोभाटा केला.

दवंडी येथील खून प्रकरणात सुरुवातीला धागेदोरे हाती लागत नव्हते, पण तपास करण्यात यश आले. फिर्यादी असलेल्या पत्नीनेच प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या सहाय्याने पतीला संपविले. तिन्ही आरोपींना जेरबंद केले असून अधिक तपास सुरु आहे.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली