शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! उपचाराअभावी डेंग्यूचे तीन बळी; आरोग्य विभाग गाफील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:10 IST

तीन ग्रामपंचायतींमध्ये उद्रेक : टेकडा ताल्ला ग्रामस्थाच्या पत्राने खळबळ

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आर्थिक परिस्थती बेताची असल्याने व वेळेत उपचार न मिळाल्याने तिघांचा बळी गेल्याचा खळबळजनक दावा टेकडा ताल्ला गावातील एका नागरिकाने केला आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. दरम्यान, तीन गावांत डेंग्यूचा उद्रेक होऊनही आरोग्य विभाग गाफील कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दुर्गम सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद, माेकेला व नेमडा या तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीत डेंग्यूने डोके वर काढले आहे. तिघांना उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप टेकडा ताल्ला येथील सुधीर मुडूमडिगेला या नागरिकाने केला आहे. सुधीर यांनी ८ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र धाडले. त्यात डेंग्यूमुळे प्राण गमावलेल्या तीन व्यक्तींची नावे नमूद असून, बाधित ११३ रुग्णांच्या नावांचाही उल्लेख आहे.

या तीन गावांत डेंग्यूचे तब्बल तीनशे रुग्ण असून, घर तेथे रुग्ण अशी सध्या स्थिती आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण राबवून पाण्याचे नमुने तपासावेत, तसेच ग्रामपंचायतीने साचलेले डबके मोकळे करून पाणी वाहते करावे, स्वच्छता करावी आणि धूरफवारणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी सुधीर मुडूमडिगेला यांनी केली आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके व टेकडा ताल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वलके यां संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

कोणी आलापल्लीला, कोणी तेलंगणाला!

दरम्यान, डेंग्यूची लक्षणे आढळलेल्यांपैकी काही रुग्ण सिरोंचातील ग्रामीण रुग्णालयात, काही आलापल्ली, काही अहेरीला, तर काहीजण तेलंगणातील मंचेरियल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रवास खर्चासह इतर खर्चामुळे या रुग्णांवर आर्थिक ताण पडत आहे.

खासगी दवाखान्यांतही वाढली गर्दी

सध्या सिरोंचातील खासगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे. काही खासगी डॉक्टर तपासणी शुल्क व डेंग्यू चाचणीसाठी हजारो रुपये घेतात. एका रुग्णाला सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, त्यामुळे गरीब व मजूर वर्गाचे हाल होत आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलGadchiroliगडचिरोली