शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

धक्कादायक! गडचिरोलीतील शालेय विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 10:46 IST

चॉकलेट खाण्याच्या वयात तंबाखू व खर्रा खाण्याच्या पडलेल्या सवयीने गडचिरोलीचे विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर आहेत.

ठळक मुद्दे१९५ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग९५ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चॉकलेट खाण्याच्या वयात तंबाखू व खर्रा खाण्याच्या पडलेल्या सवयीने गडचिरोलीचे विद्यार्थी कॅन्सरच्या उंबरठ्यावर आहेत. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने जानेवारी महिन्यात गडचिरोली येथील सहा आश्रमशाळांना भेट देऊन २१५० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता पाचवी ते पदवीच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे व्यसन आढळून आले. धक्कादायक म्हणजे यातील १९५ विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळातील अनेक छोट्या-मोठ्या चौकातील पानठेल्यांवर व आता किराणा दुकानातही तंबाखूजन्य पदार्थ विशेषत: खर्रा सहज मिळतो. पूर्वी ‘पानां’साठी प्रसिद्ध असलेले पानठेले आता खर्रा, गुटख्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. या पानठेल्यांमधून दिवसभर खर्रा घोटणारी तरुणाई दिसून येते. अनेक पानठेल्यांमध्ये तर खर्रा घोटण्यासाठी आधुनिक यंत्रही बसविण्यात आले आहे. तोंडात खर्याचा बोकणा आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाऱ्याचे ‘परिणाम’ मात्र, आता दिसून येऊ लागले आहेत.आदिवासी विकास विभागांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ‘सीएम फॅलो’ डॉ. साफवान पटेल यांनी ९ आॅक्टोबर २०१७ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भाकरोडी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केली असता येथील २० मुलांमध्ये मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आली होती.यामुळे महाराष्ट्र शासन सचिवांनी आदिवासी विकासाच्या अपर आयुक्तांना नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय दंत रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या चमूने अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्या मार्गदर्शनात २९ ते ३१ जानेवारी २०१८च्या दरम्यान गडचिरोली येथील सहा आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तपासणी केली. यात पहिली ते पदवीपर्यंतच्या २१५० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ६३ टक्के म्हणजे १३४३ विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन तर पाचवी ते पदवीपर्यंतच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांना तंबखूचे व्यसन असल्याची बाब उघडकीस आली. यातील १९५ विद्यार्थ्यांना मुख पूर्व कर्करोगाचे निदान झाले.

तंबाखू खाणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ३० टक्केशासकीय दंत रुग्णालयाने गडचिरोली येथे केलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीत साधारण ७० टक्के मुलांमध्ये तर ३० टक्के मुलींमध्ये तंबाखूचे व्यसन आढळून आले. कमी वयात तंबाखूचे व्यसन जडल्याने हे विद्यार्थी मुख पूर्वकर्करोगाच्या वाटेवर आहेत. तातडीने उपचार न मिळाल्यास हे विद्यार्थी कर्करोगाच्या विळख्यात सापडण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे.

कमी वयात तंबाखूचे व्यसन धक्कादायकचलहान वयात तंबाखूचे व्यसन हे धक्कादायकच आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या पहिल्या टप्प्यातील तपासणीतच १९५ विद्यार्थी मुखपूर्व कर्करोगाचे आढळून आले. यामुळे ८ फेब्रुवारीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या चार्माेशी, रांगी येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीकडे आमचे विशेष लागले आहे. मुख पूर्वकर्करोग साधारण दहा वर्षानंतर मुखाच्या कर्करोगात बदलतो. यामुळे वेळीच सामूहिक प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना खर्रा, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे आवश्यक आहे.-डॉ. सिंधू गणवीरअधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्य