शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आणखी एका शाळेत आदिवासी विद्यार्थिनींची शिक्षकांकडून छेड

By संजय तिपाले | Updated: April 9, 2025 16:15 IST

अहेरी तालुक्यातील घटना : गुणाकार शिकविण्याचा बहाण्याने 'बॅड टच'

संजय तिपाले/गडचिरोलीगडचिरोली : भामरागड तालुक्यातील दोन शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींची छेड काढल्याची प्रकरणे गाजत असतानाच ९ एप्रिलला अहेरी तालुक्यातूनही घृणास्पद घटना समोर आली आहे. एका आश्रमशाळेत सातवी व आठवीत शिकणाऱ्या दोन आदिवासी विद्यार्थिनींची दोन शिक्षकांनी छेड काढल्याप्रकरणी रेपनपल्ली ठाण्यात विनयभंग  व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला.

श्याम पांडुरंग धाईत (५४) व दिलीपकुमार भिवाजी राऊत (५६) अशी त्या शिक्षकांची नावे आहेत. अहेरी तालुक्यातील एका दुर्गम गावातील आश्रमशाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या फिर्यादीनुसार, २८ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता वर्गशिक्षक श्याम धाईत हे गुणाकार शिकवत होते, मी पहिल्या बाकड्यावर मैत्रिणीसह बसले होते. मात्र, नंतर शिक्षक धाईत यांनी मला बाजूला असलेल्या बाकड्यावर बसायला सांगितले. त्यानंतर ते माझ्या बाकड्यासमोर खुर्ची घेऊन बसले व 'बॅड टच' केला. यापूर्वीही त्यांनी छेड काढली होती, असा आरोप पीडितेने ठेवला आहे. याशिवाय सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने १५ दिवसांपूर्वी वर्गशिक्षक दिलीपकुमार राऊत यांनी पाणी आणून देण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे. या दोघींनी ३० मार्च रोजी प्राचार्य व अधीक्षिका यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर फोनवरुन घरीही कळविले. ८ एप्रिल रोजी पीडितेच्या फिर्यादीवरुन रेपनपल्ली ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७५  (१)३५१, सहकलम १२ पोक्सो, सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), (डब्ल्यू ), ३ (२) अन्वये गुन्हा नोंद झाला. 

शाळेतून काढण्याची धमकीपीडित विद्यार्थिनीला दबावात घेऊन संबंधित शिक्षकाने 'कोणाला काही माहिती दिली तर शाळेतून काढून टाकू ' ,अशी धमकी दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे. अखेर ८ रोजी कुटुंबीयासह दोन्ही विद्यार्थिनींनी रेपनपल्ली ठाणे गाठून आपबिती सांगितली.

महिनाभरात तिसरी घटना

दक्षिण गडचिरोलीत विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे महिनाभरातील हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी ५ मार्च रोजी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावात जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाने चार विद्यार्थिनींशी अश्लाघ्य कृत्य केले होते, त्यानंतर भामरागड शहरातील समूह शाळेत मुख्याध्यापक मालू नाेगो विडपी या मुख्याध्यापकाने तिसरी, चौथी व पाचवीत शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींची छेड काढल्याचे प्रकरण ११ मार्च रोजी उजेडात आले होते. आता अहेरी तालुक्यात दोन विद्यार्थिनींवरही असाच प्रसंग ओढावला, त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगGadchiroliगडचिरोली