शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘ती’ चढली पॉवरग्रीडच्या टॉवरवर; गडचिरोलीत तीन तासांचे थरारनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:32 IST

कोरचीपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगाव येथे बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास एक महिला पॉवरग्रीडच्या टॉवरवर चढल्याचे गावातील महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा सुरू केला.

ठळक मुद्देपोलीस, प्रशासनाची उडाली चांगलीच धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरचीपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगाव येथे बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास एक महिला पॉवरग्रीडच्या टॉवरवर चढल्याचे गावातील महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा सुरू केला. दरम्यान लोकमतचे प्रतिनिधी खासगी कामासाठी तेथे गेले असता त्यांनी ही गडबड ऐकली व प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिस व प्रशासनाशी संपर्क साधला.या महिलेने खाली उतरावे म्हणून पोलिस अधिकारी, अन्य कर्मचारी वर्ग, तहसीलदार, राजस्व विभागाचे कर्मचारी आणि गावकरी शर्थीचे प्रयत्न करू लागले. मात्र ही महिला टॉवरच्या मध्यभागी पोहचली असल्याने तिला खाली उतरताही येत नव्हते. हे टॉवर उच्च विद्युत दाबाचे असल्याने तिच्या जीवाचे काही बरेवाईट होऊ नये यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. ती चुकून खाली पडली तर तिला इजा होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी एक मोठा पडदा हाती धरला होता. अखेर काही बहाद्दरांनी टॉवर चढून जाऊन तिला हळूहळू खाली उतरविले. या संपूर्ण घडामोडीला तब्बल तीन तास लागले. विदर्भातला उन्हाचा भर दुपारचा तडाखा सहन करत गावकरी तिच्या सुटकेसाठी तिष्ठत होते.ही महिला २४ वर्षांची असून कोरची येथील असून तिचे नाव रामकली रुपेंद्र जमकातन असे आहे. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. काही दिवसांपासून ती वेडसर वागत असल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात