शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

लोकसभेत शरद पवार, उध्दव ठाकरेंकडे पाहून जनतेचा कौल मिळाला, असं नाही : राज ठाकरे

By संजय तिपाले | Updated: August 22, 2024 18:51 IST

राज ठाकरेंची कोपरखळी: उमेदवारी देताना आयारामांपेक्षा निष्ठावंतांनाच प्राधान्य

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यांना पाहून लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं असं नाही, तर भाजपविरोधी वातावरणाचा फायदा त्यांना झाला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोपरखळी मारली. नवनिर्माण यात्रेनिमित्त २२ ऑगस्टला ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले.

राज ठाकरे यांचे शहरात दुपारी १२ वाजता आगमन झाले. इंदिरा गांधी चौकात त्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर ते चंद्रपूर रोडवरील शासकीय विश्रामगृहात पोहोचले. यावेळी तिन्ही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी एकत्रित संवाद साधला. पुत्र अमित ठाकरे, मनसे नेते अनिल शिदोरे, प्रवक्ते व पक्ष निरीक्षक गजानन काळे, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

यानंतर माध्यमांनी अनौपचारिक चर्चेत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय व मुस्लीम मतदान महाविकास आघाडीकडे गेले, पण प्रत्येक निवडणुकीची गोष्ट वेगळी असते, त्यामुळे विधानसभेलाही असेच चित्र राहील, असे नाही.

आपण स्वत: निवडणूक लढवणार का या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असे उत्तर दिले. आगामी विधानसभा निडणूकीत कुणाला कौल मिळेल हे आताच सांगता येत नाही,पण राजकीय परिस्थिती आणि पक्षांची एवढी सरमिसळ झाली आहे की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. इतर पक्षातील बंडखोर आमच्याकडे आल्यास थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ नंतर आलेल्यांचा विचार करू, असे सांगून त्यांनी आयारामांनाही सूचक इशारा दिला. विधानसभा निवडणुकीत विदर्भातील बहुतांश जागा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत उमेदवार देताना केवळ लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविणारजिल्ह्यात मनसेचा तितका प्रभाव नाही. कधी आंदोलन नाही की कुठल्या प्रश्नावर पदाधिकारी बाजू मांडत नाही. संघटनात्मक ताकदही दिसत नाही, याविषयी राज ठाकरे यांनी सांगितले की, नवनिर्माण यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोलीतआधी नेहमी येणे व्हायचे, आता खूप वर्षांनी आलो आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटवून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अद्याप कोणी संपर्कात नाहीभाजपमध्ये उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहे. त्यामुळे कोणी संपर्कात आहे का, यावर राज ठाकरे यांनी अद्याप कोणी संपर्कात नाही, असा खुलासा केला. गडचिरोलीत किती जागांवर उमेदवार देणार, हे अद्याप ठरवले नाही, असेही त्यांनी सांगितले.

आदिवासी नृत्याने भारावले राज ठाकरेशासकीय विश्रामगृह परिसरात आगमन झाले तेव्हा स्वागतासाठी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी जीपमधून उतरून राज ठाकरे हे थेट पारंपरिक आदिवासी वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांकडे गेले व त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचा पोशाख व वाद्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी कलावंतांच्या आग्रहास्तवर त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGadchiroliगडचिरोली