शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

शापोआ कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Updated: June 20, 2015 02:16 IST

अत्यल्प मानधनात शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष ...

मुलचेरात गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : मानधन वाढ त्वरित लागू करामुलचेरा : अत्यल्प मानधनात शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आयटकच्या नेतृत्त्वात कर्मचाऱ्यांनी बुधवारी मुलचेरा पंचायत समितीसमोर तीव्र निदर्शने केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी हेडाऊ यांच्याशी समस्यांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. शालेय पोषण आहार कर्मचारी मागील १४ वर्षांपासून ग्रामीण व नगर परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम तसेच शाळा उघडणे तसेच शाळेची देखरेख, स्वच्छता व इतर कामे प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यामुळे त्यांना चपराशी कम कुक या पदावर नेमून १५ हजार प्रतिमाह वेतन द्यावे, जुन्या स्वयंपाकी महिलांना कामावर ठेवावे, नवीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांना निवडीच्या प्रकारावर पायबंद घालावा, ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचे मानधन व इंधन बिल त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, स्वयंपाकी महिलांचे अद्यापही मानधन वाढले नाही, मागील हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाच ते साडेसात हजार मानधन वाढीचे आश्वासन दिले होते. परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही. पोषण आहार कर्मचाऱ्यांना पोषण आहार शिजविण्याव्यतिरिक्त कामे देऊन नयेत, दिल्यास त्याचा अतिरिक्त मोबदला द्यावा, प्रत्येक गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा, वयाच्या ६० वर्षानंतर किमान तीन हजार पेंशन देण्यात यावे, तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून इंधन बिल प्राप्त झाले नाही. त्यामुळे ते त्वरित द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष विनोद झोडगे, पौर्णिमा मालाकार, किशोर सुनतकर, सुमित्रा घोष हजर होत्या. (तालुका प्रतिनिधी)