शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
3
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
4
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
5
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
6
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
7
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
8
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
10
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर, नागपंचमी एकत्र? जाणून घ्या तारखा आणि 'अशी' करा तयारी!
11
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
12
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
13
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
14
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
15
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
16
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
17
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
18
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
19
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
20
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!

सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास ...

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

चामाेर्शी : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमा सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी

देसाईगंज : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने घसरून अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.

झुडपामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात

धानाेरा : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र, यातील बहुतांश गावांतील तलावात व बोड्यांमध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप तसेच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सरपणासाठी महिला जंगलात

घाेट : आर्थिकदृष्ट्या गॅस सिलिंडर परवडणारा नाही. तसेच रॉकेल देणेही शासनाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्य प्राण्यांच्या दहशतीत महिलांना जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे. त्यामुळे सिलिंडर तसेच राॅकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

एटापल्लीतील अनेक शाळा विजेविनाच

एटापल्ली : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.

रोजगार हमीची कामे सुरू करावी

चामाेर्शी : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाहीत. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र, यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे. बेराेजगार वाढतच आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी धानोरा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

पीएचसीसाठी इमारत बांधण्याची मागणी

भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लाहेरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वसा येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागेपल्लीचे दूध शीतकरण केंद्र सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

तोडसा येथे भ्रमणध्वनी टॉवर उभारा

एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात. तोडसा परिसरात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने मोठी अडचण होते.

आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची रुंदी वाढवा

आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाते वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्षच आहे.

कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

सिरोंचा शहरात डुकरांचा हैदोस वाढला

सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाण निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा

चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.

गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका

आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशाप्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

गाेकुलनगर रस्त्यांची दुरुस्ती करा

गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्यांची नगरपरिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणच्या नाल्या तुडुंब आहेत.

ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज

धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा

आष्टी : विजेची बचत करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी आहे.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : शासनाच्यावतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.

घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले

गडचिरोली : नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाणपाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाले आहेत. या गटाराच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.