तेलंगणाच्या वाहनातून तस्करी : नंदीगाव बसथांब्याजवळ ४२ नग आढळलेसिरोंचा : सिरोंचा वन परिक्षेत्रात वन परिक्षेत्र अधिकारी राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनात २० जून रोजी गस्त सुरू असताना एक वाहन जंगलात फिरत असल्याचे दिसून आले. या वाहनाचा पाठलाग करीत सिरोंचा ते आलापल्ली महामार्गावर नंदीगाव बसथांब्याजवळ वाहन अडविण्यात आले. या वाहनातून १ लाख २५ हजार १०० रूपये किमतीच्या ४२ नग २.५०२ घनमिटर लाकूड जप्त करण्यात आले व हे वाहन वन कार्यालयात आणण्यात आले.२० जून रोजी टीएस ०१-यूबी १३९७ क्रमांकाचे वाहन सिरोंचा वन परिक्षेत्रात जंगल परिसरात फिरत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. या वाहनाचा पाठलाग सुरू केल्यावर ते वाहन सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर नंदीगाव जवळ थांबविण्यात आले. वाहन थांबतात. वाहनचालक व दुसरा एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. वाहनाची तपासणी केल्यावर तेलंगणा राज्यातील पासिंग असलेल्या या वाहनात सागवान जातीचे कटसाईज सिलपाट ४२ नग आढळून आले. २.५०२ घनमिटरच्या लाकडाची बाजारात किमत १ लाख २५ हजार १०० रूपये आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. सदर वाहन २१ जून रोजी रात्री १.१५ वाजता हे वाहन वन कार्यालयात सिरोंचा येथे आणण्यात आले. सदर कारवाई सिरोंचाचे वनपरिक्षेत्राधिकारी राकेश सेपट (भा.व.से) यांच्या मार्गदर्शनाखाली कारसपल्लीचे क्षेत्र सहायक एस. एस. येनगंटीवार, सिरोंचाचे क्षेत्र सहायक आर. व्ही. तुम्मावार, वनरक्षक अजय इरकीवार, ए. आर. बुध्दावार, एन. सिडाम, वाहनचालक सिडाम, समीर शेख, अशोक तोडसाम, शेष मेनन यांच्यासह वनमजुरांनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)
सिरोंचात सव्वा लाखांचे सागवान जप्त
By admin | Updated: June 22, 2016 00:50 IST