मी मागच्या वेळी खासदार असताना लॉयड मेटल्स कंपनीच्या मालकानी माझी भेट घेऊन लोहप्रकल्पाकरिता सहकार्य मागितले. त्यावेळी जिल्ह्यातच प्रकल्प उभारून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अटीवर मी पुढाकार घेऊन तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेऊन प्रकल्पांचा मार्ग मोकळा केला. नक्षल घटनेनंतर पोलीस संरक्षण दिले. परंतु अपघातानंतर कामबंद झाले. आता नव्याने दुसऱ्या कंपनीमार्फत हे काम सुरू केले. या कंपनीने स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना न डावलता त्यांना रोजगार द्यावा, असे खा.नेते म्हणाले.
पत्रकार परिषदेत प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बरसागडे, जिल्हा सचिव संदीप कोरेत, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवर, प्रदेश युवा मोर्चा सदस्य स्वप्नील वारघंटे, तालुका अध्यक्ष बाबुराव गंपावार, महामंत्री प्रसाद पुल्लूरवार, जनार्धन नाल्लावर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निखिल गादेवार, अशोक पुल्लूरवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संपत पैडाकुलवार आदी उपस्थित होते.
(बॉक्स)
विकासासाठी प्रकल्प आवश्यक
स्थानिक अकुशल बेरोजगार लोकांना प्रशिक्षण देऊन कुशल बनवावे आणि त्यांनाच कामावर घ्यावे, असे खा.नेते यांनी सुचविले. प्रकल्पाला ग्रामसभेचा विरोध असल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, प्रकल्प झाल्यास तालुक्याचा विकास होणार, हजारो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने प्रकल्प आवश्यक असल्याचे खासदार म्हणाले.