शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

दीड हजार रुग्णांना सेवा

By admin | Updated: February 11, 2015 02:05 IST

स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दीड हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

अहेरी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दीड हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात खासगी रुग्णालयांची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळत नाही. रस्त्यांची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, पक्षघात आदी रूग्णांना शोधून त्यांची तपासणी करून समुपदेशन व औषधोपचार करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयाच्या कक्षेत येत असलेल्या मोसम, नंदीगाव, रामय्यापेठा, येदरंगा, व्यंकटरावपेठा, अवलमारी, गेडसेगुडम, रामनगट्टा, व्यंकटापुर, हत्तीगाव, नरसिंहापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, असरअल्ली, विठ्ठलरावपेठा आदी गावांमध्ये शेकडो आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रियंका गेडाम, समुपदेशक मनीषा कांचनवार, अधिपरिचारिका कीर्ती आत्राम, डॉ. मनीषा मडावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शुभांगी वाळके, डाटाएन्ट्री आॅपरेटर, महेंद्र बांदूरकर आदींनी केले. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यातही या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरापूर्वी जनजागृती केली जात असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. (तालुका प्रतिनिधी)