शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे ॲप देणार दुर्गम भागात सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 22:35 IST

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती आणि पोलीस अंमलदारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी पोलीस मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळेत १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यांना ॲपबाबत माहिती देण्यात आली. या ॲपमुळे दुर्गम भागात नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ घेणे अधिक साेपे हाेणार आहे. त्यासाठी इंटरनेटचे जाळेही वाढणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आता पोलिसांनी विशेष ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे आता दुर्गम-अतिदुर्गम भागांतील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत बँक सेवा, जात प्रमाणपत्र, पीक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई-श्रम कार्ड, पेन्शन सर्व्हिस, इन्शुरन्स यासारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करू देणे सोईचे होणार आहे.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती आणि पोलीस अंमलदारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी पोलीस मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळेत १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यांना ॲपबाबत माहिती देण्यात आली. या ॲपमुळे दुर्गम भागात नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ घेणे अधिक साेपे हाेणार आहे. त्यासाठी इंटरनेटचे जाळेही वाढणार आहे.यावेळी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उत्कृष्ट काम करणा­या युवक-युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला.या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, तसेच डिस्ट्रिक्ट मॅनेजर आकाश खोडवे, विशाल कुंभाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, उपनिरीक्षक धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

२८६६ युवक-युवतींना मिळाला रोजगार-    आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ५१२ सुरक्षा रक्षक, ११४३ नर्सिंग असिस्टंट, ३१४ हॉस्पिटॅलिटी आणि इतर वेगवेगळ्या ट्रेडचे प्रशिक्षण देऊन २८६६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. -    तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापूर, गडचिरोली आणि बीओआय आरसेटी गडचिरोली यांच्यामार्फत ब्युटीपार्लर, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बदक पालन, वराहपालन, शिवणकला, भाजीपाला लागवड, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अशा विविध प्रशिक्षणांतून ३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविण्यात आला आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस