शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सुभाषग्राम - घोट मार्गावर गंभीर अपघात ; दुचाकी झाडावर आदळून दोन भावंडांसह तिघे ठार

By संजय तिपाले | Updated: April 17, 2025 17:10 IST

सुभाषग्राम - घोट मार्गावरील घटना : अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट

संजय तिपाले  गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सुभाषग्राम - घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. यात तिघे ठार झाले. १७ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. 

साहेब सुभाशिष चक्रवर्ती (१६), सौरभ सुभाशिष चक्रवर्ती (२०, दोघे रा. वसंतपूर ता. चामोर्शी) व विशाल भूपाल बच्छाड (१९,रा. शिरपूर क्र.१० तेलंगणा) अशी मृतांची नावे आहेत.  हे तिघे जण वसंतपूर येथून घोटकडे दुचाकीने जात होते. ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व सागवानाच्या झाडावर आदळली. या धडकेत साहेब चक्रवर्ती व सौरभ चक्रवर्ती ही भावंडे जागीच मृत्युमुखी पडली. उपचारादरम्यान विशाल बच्छाड याचा मृत्यू झाला.  मृतदेह चामोर्शी  ग्रामीण रुग्णालय उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.

दुचाकी जळून खाकधडक एवढी जोराची होती की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात जळून खाक झाली. घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नीतेश गोहणे हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAccidentअपघात